जांभोरी येथे भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा


आंबेगाव – मोसीन काठेवाडी

भारताचा स्वातंत्र्यदिन जांभोरी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायत जांभोरी या ठिकाणी सरपंच सुनंदाताई पारधी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल येथे शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य संजयदादा केंगले यांचे हस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले व जिल्हा परिषद प्राथ. शाळा येथे शालेय व्य. समिती अध्यक्ष पुष्पा केंगले यांचे हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व ध्वजगीतासोबत राज्यगीत घेण्यात आले व छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला .

या वेळी जिल्हा परिषद प्राथ. शाळा व न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी आपली मनोगते व्यक्त केली.गावच्या सरपंच सुनंदाताई पारधी,उपसरपंच बबन केंगले, माजी सरपंच ,संजयदादा केंगले, पोलीस पाटील नवनाथ केंगले, आदिवासी युवा नेते मारुतीदादा केंगले, खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे, किसन शेळके, सुभाष भोकटे, माजी सैनिक मुरलीधर केंगले, दुंदा भोकटे, लताबाई केंगले, अंकुश गिरंगे, निवृत्ती केंगले, ग्रामसेवक चारुशीला बोडरे, मारुती पारधी, मारुती केंगले, पुष्पा केंगले, संजय केंगले, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक केंगले सर उपशिक्षक देशमुख सर, चव्हाण सर, किसन केंगले हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक केंगले सर व वरे सर यांनी केले तर आभार चव्हाण सर यांनी मानले.

Previous articleग्रामोन्नती मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रक्तदान शिबिर उत्साहात
Next articleपाटस व्यापारी संस्थेकडून भव्य दिव्य व्यावसायिक मार्गदर्शन मेळावा