दौंड पाटस रोडवरील भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांनी पेटवली कार

योगेश राऊत

पाटस-दौंड अष्टविनायक मार्गावरील बिरोबावाडी हद्दीत दौंडच्या दिशेने जाणाऱ्या कार गाडीची दुचाकीला धडक बसुन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . शनिवारी (ता.१४) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे. या अपघातात नेहाल अप्पा गावडे (वय २७, रा.बिरोबावाडी ता.दौंड जि.पुणे) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

बिरोबावाडी येथील नेहाल गावडे हा तरुण सकाळी आठच्या सुमारास बिरोबावाडी ग्रामदेवताचे दर्शन घेऊन दुचाकीवरुन अष्टविनायक मार्ग ओलांडुन पुढे जात होता. त्यावेळी दौंडच्या दिशेने जाणाऱ्या कारची दुचाकीला जोराची धडक बसली. या अपघातात नेहालच्या डोक्याला जबर मार लागुन त्याच्या कानातुन रक्तस्त्राव होवू लागला. उपस्थित नागरीकांनी गंभीर जखमी नेहालला उपचारासाठी हॉस्पिटला पाठवुन दिले. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, नेहाल हा आई-वडीलांचा एकुलता एक मुलगा होता. तो इंजिनियर चे शिक्षण घेत होता. मृत्यू झाल्याचे समजताच संतप्त जमावाने कारला आग लावली. काही वेळातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या कारचे मोठे नुकसान झाले. याबाबत प्रमोद वायाळ यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी दिली आहे .

अधिक माहीती मिळताच यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांच्यासह आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Previous articleदर्जेदार शिक्षणासाठी समाजाचा सहभाग गरजेचा – अमित बेनके
Next articleलोणी भापकर येथे पोलीस भरती, इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य नागरी सत्कार : श्री काळभैरव नाथ मंदीर, स्वच्छता अभियान फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम