आवकाळी पाऊस व गारपीटीमुळे हिरडा पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई मिळावी यासाठी बिरसा ब्रिगेडचे आंबेगाव तहसीलदारांना निवेदन

मोसीन काठेवाडी ,घोडेगाव

मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस चालू आहे.या आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीतील अनेक पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.आबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील मागील अनेक दिवस हा अवकाळी पाऊस पडत आहे.त्यातच भीमाशंकर आणि आहुपे खोऱ्यात गारांचा पाऊस झाल्याने हिरडा या वन उत्पादनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आदिवासी समाजाचे प्रमुख आर्थिक साधन म्हणून हिरडा पिकाकडे पहिले जाते. वर्षातून एकदा येणाऱ्या या पिकावरच आदिवासी समाजाचे आर्थिक नियोजन अवलंबून असते.त्याचं पिकाचे नुकसान झाल्याने आदिवासी समाज हवालदिल झालेला आहे.

या सर्वांचा विचार करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून लोकांना त्याची त्वरीत भरपाई मिळावी असे निवेदन बिरसा ब्रिगेड आंबेगावच्या वतीने पुणे जिल्हा येथील मातृशक्ती प्रमुख उमाताई मते यांच्या अध्यक्षतेखाली आंबेगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार संजय असवले यांना देण्यात आले.

यावेळी ताराबाई डामसे,मंगलताई कवठे, कविताताई डगळे,अरुणाताई खमसे या बिरसा ब्रिगेडच्या रणरागिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Previous articleसंत निरंकारी मिशन द्वारे विश्वव्यापी महा रक्तदान अभियानाचे आयोजन
Next articleश्री मुक्ताई देवीच्या यात्रेनिमित्त चार कोटींचे संरक्षक विमा कवच ; विक्रांत क्रीडा मंडळाचा उपक्रम