आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदी तुकाराम काळे तर सचिवपदी अक्षय काळे यांची निवड


 मोसीन काठेवाडी,घोडेगाव

आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित जनता विद्या मंदिर घोडेगाव,जनता विद्या मंदिर भागशाळा सालगाव, श्री मुक्ताई प्रशाला पिंपळगाव घोडे, जनता विद्यार्थी वस्तीगृह घोडेगाव, ज्युनिअर कॉलेज आर्ट, कॉर्मस, सायन्स, एम. सी व्ही सी विभाग घोडेगाव, बी.डी काळे महाविद्यालय घोडेगाव, न्यु इंग्लीश मेडीयम स्कुल घोडेगाव, व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर सर्टिफिकेट कोर्स इन नर्सिंग केअर इ विभाग येतात.या शैक्षणिक संस्थेच्या सभासदांची  आज शनिवार दि.२५ मार्च २०२३ रोजी मिटींग संपन्न झाली. या मध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी तुकाराम काळे तर सचिवपदी अक्षय काळे यांची आठ सदस्यांच्या उपस्थित  निवड करण्यात आली. तसेच इतर पदाची निवड प्रक्रिया पार पडली. ती पुढील प्रमाणे


कार्यकारी मंडळ
1)अध्यक्ष- श्री.तुकाराम ना. काळे
2)कार्याध्यक्ष- श्री.शामकाका होनराव
3)सचिव- श्री.अक्षय (बंटी) काळे
4)खजिनदार- श्री.अक्षय(बंटी) काळे
5)समन्वय समिती- श्री.शामकाका होनराव
6)इंग्लिश मि.चेअरमन-
श्री.बाळासाहेब काळे
7)बी.डी.काळे महाविद्यालय विकास समिती व नर्सिंग डिप्लोमा चेअरमन- ॲड.मुकुंद काळे
8)वसतीगृह चेअरमन- श्री.बाळासाहेब काळे

सल्लागार मंडळ
1)श्री.शिवाजीराव घोडेकर
2)श्री.शिवदास काळे
3)ॲड.मुरलीधर काळे
4)ॲड.महेश काळे
5)श्री.नरेंद्र काळे

सुकाणू समिती
1)श्री.निळकंठ (काका) होनराव
2)श्री.जयसिंग (काका) काळे
3)श्री.अजित (काका) काळे
4)डाॅ.विलासराव काळे
5)श्री.विलासराव शिंदे

Previous articleकर्जत येथील मेळाव्यास जास्तीत जास्त तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी उपस्थित राहण्याचे एस.एम देशमुख यांचे आवाहन
Next articleबी.डी.काळे महाविद्यालयात जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा