शिनोलीच्या तलाठ्याला एक हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

मोसीन काठेवाडी, घोडेगाव

जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर फिर्यादीच्या नावाची दुरुस्ती करण्याकरिता १ हजार रुपयाची लाच मागणी करून ती स्वीकारल्या प्रकरणी शिनोली ता.आंबेगाव येथील तलाठी विलास महादेव शिगवण वय ५६ याच्यावर लाच लुचपत विभागाने कारवाई केली असून त्याच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की ५९ वर्षीय शेतकऱ्याची सातबारा उताऱ्यावर नावाची दुरुस्ती करण्याकरता तलाठी विलास शिगवण यांनी त्याच्याकडे १ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत सदर व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचेकडे तक्रार दाखल केली होती. याबाबत लाच लुचपत विभागाने दिनांक २४ रोजी सापळा लावुन लाच स्वीकारताना तलाठी विलास शिगवण यांना शीनोली येथील तलाठी कार्यालयात पकडले आहे. पुढील तपास लाचलुचपत विभागाच्या डीवाय एस पी क्रांती पवार करत आहेत. आशी माहिती घोडेगावचे कर्तव्यदक्ष साहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.

Previous articleहा पुरस्कार माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या तमाम मायबाप मतदारांचा’ संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भावना
Next articleकर्जत येथील मेळाव्यास जास्तीत जास्त तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी उपस्थित राहण्याचे एस.एम देशमुख यांचे आवाहन