सुरज वाजगे यांनी वाढदिवस उत्साहात साजरा न करता आरोग्य सेवकांना सॅनिटायझर, मास्क व पी.पी.ई.किटचे केले वाटप

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज वाजगे यांनी आरोग्य सेवकांना  सॅनिटायझर, मास्क व पी पी ई कीटचे वाटप करून आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला.

सध्या सर्वत्र कोरोणा विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे. कोरोनामुळे अनेक जवळची माणसे या जगातून दूर निघून गेली यामध्ये जुन्नर तालुक्यातील पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ पवार, जुन्नर चे माजी नगराध्यक्ष दिनेश दुबे, ज्येष्ठ शिक्षक सुनील वाव्हळ, पिंपळगाव चे माजी सरपंच निखिल गावडे यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. या अनुषंगाने आपल्या जवळची माणसे दुरावल्या मुळे आपला वाढदिवस आनंदोत्सव म्हणून नाही तर सामाजिक भान जपून साजराकरण्याचे तालुकाध्यक्ष सुरज वाजगे यांनी ठरवले.

आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून  जुन्नर तालुक्यातील ओझर, लेण्याद्री, नारायणगाव येथील कोवीड सेंटरमध्ये आमदार अतुल बेनके यांच्या उपस्थित ॠषी दिनेश दुबे, मयूर दशरथ पवार व आयुष सुनिल वाव्हळ यांच्या हस्ते सुरक्षाकिटचे वाटप करण्यात आले.

कोरोनामुळे अचानकपणे आपल्यातून ही जीवा-भावाची माणसं सोडून गेली. ह्या सर्व जनतेतील लोकनेत्यांचं, मार्गदर्शकांचं कोरोनामुळे शेवटंचं अंत्यदर्शन पण घडले नाही या सर्व घटना खुप दुर्दैवी आहेत. या सर्वांना श्रद्धांजली म्हणून जुन्नर तालुका आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर,कर्मचारी यांना सुरक्षाकिटचे वाटप कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते करण्यात आले  व  वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

Previous articleनारायणगाव येथे रक्तदान शिबिरात दीडशे जणांचा सहभाग
Next articleलायन्स क्लब ऑफ राजगुरूनगर व शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित गणेशोत्सव मोहिमेचा शुभारंभ