नारायणगाव येथे रक्तदान शिबिरात दीडशे जणांचा सहभाग

नारायणगाव-नारायणगाव येथील वॉर्ड नंबर सहा यांच्यावतीने तसेच शिव झुंजार मित्र मंडळाच्या सहकार्याने पाटे खैरे मळा येथील मराठी शाळेत व शेटे मळा येथील अटलांटा सिटी सोसायटी मध्ये आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

पाटे खैरे मळा येथे सुमारे एकशे पाच जणांनी रक्तदान केले तर शेटे मळा येथे सुमारे ४५ जणांनी रक्तदान केले.पत्रकार किरण वाजगे यांनी देखील या शिबिरात रक्तदान केले. ३५ व्या वेळी रक्तदान केल्याबद्दल किरण वाजगे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी या शिबिरात उत्स्फूर्त पणे रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांच्या वतीने एक हेल्मेट, रोपटे, सॅनिटायझर व मास्क देण्यात आले.

Previous articleभिमाशंकर इको सेन्सेटिव्ह झोनला आदिवासी बांधवांचा विरोध
Next articleसुरज वाजगे यांनी वाढदिवस उत्साहात साजरा न करता आरोग्य सेवकांना सॅनिटायझर, मास्क व पी.पी.ई.किटचे केले वाटप