लायन्स क्लब ऑफ राजगुरूनगर व शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित गणेशोत्सव मोहिमेचा शुभारंभ

राजगुरुनगर-हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या जयंती निमित्त लायन्स क्लब ऑफ राजगुरूनगर व शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राजगुरूनगर (ता. खेड) येथील छत्रपती चौकात ‘सुरक्षित गणेशोत्सव मोहीम’ सुरू करण्यात आली.

 या मोहिमेचा शुभारंभ सोमवारी (दि. २४) खेडचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख, छत्रपती ग्रुपचे संस्थापक मंगेश गुंडाळ, क्लब जिल्हा खजिनदार संतोष सोनावळे, विभाग अध्यक्ष संजय वाडेकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष कृणाल रावळ, मंडळाचे अध्यक्ष रवी आवटे, चाकण क्लबचे अध्यक्ष  रवींद्र सातकर, माजी अध्यक्ष विष्णू कड आदी उपस्थित होते.

या मोहिमे अंतर्गत गणेशोत्सव काळात  शहरात ५००० मास्क व ५०० सॅनिटाईजर बॉटल्सचे मोफत वाटप करण्यात येणार आहेत. शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ शहरातील सर्व मंडळांना हे मेडिकल किट देणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात नवयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष सचिन सावंत व भोपाळबुवा मंडळाचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्याकडे मेडिकल किट देण्यात आले. त्याचप्रमाणे कोरोना काळात फिल्ड वर्क करणारे  पत्रकार, पोलिस कर्मचारी, आरोग्य विभाग व नगरपरिषद कर्मचारी यांना देखील मेडिकल किट वाटण्यात येणार आहे. या सर्व विभागप्रमुखांना प्रातिनिधिक स्वरूपात मेडिकल किट उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी सतिश गुरव यांनी लायन्स क्लबच्या समाजोपयोगी कार्यात यापुर्वीही सहभागी झाल्याचे अनुभव कथन केले. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून पुढील काळातील विधायक कार्यासाठी  सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. लायन्स क्लबच्या वतीने संतोष सोनावळे यांनी तर गणेश मंडळाच्या वतीने संदीप वाळुंज यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे संयोजन शुभम भन्साळी, दर्शन रावळ, महेश इंगळे, डॉ. सागर गुगलिया, नितीन दोंदेकर, मिलिंद आहेर आदींनी केले. स्वागत व प्रास्ताविक अमितकुमार टाकळकर यांनी केले. सूत्रसंचालन अक्षता कान्हूरकर यांनी तर आभार प्रदर्शन अंबर वाळुंज यांनी केले.

Previous articleसुरज वाजगे यांनी वाढदिवस उत्साहात साजरा न करता आरोग्य सेवकांना सॅनिटायझर, मास्क व पी.पी.ई.किटचे केले वाटप
Next articleविवाह सोहळ्यामुळे  वधूसह १२ कोरोना बाधित, तर वधूच्या आजीचा मृत्यू