महाळूंगे येथील जिल्हा परिषद शाळेत अजित मेदनकर यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा : पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक

चाकण- मेदनकरवाडी नगरीचे सुपुत्र व सध्या भोसरी येथे स्थायिक असलेले संगणक अभियंता श्री अजित शेठ लक्ष्मण मेदनकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या अर्धांगिनी सौ शितल अजित मेदनकर यांनी लिहिलेले ‘व्यासपीठावरील दीपस्तंभ’ पुस्तकाचे वाटप शाळेतील शंभर विद्यार्थ्यांना करण्यात आले. श्री अजित मेदनकर हे अध्यात्मिक वारसा असलेले व समाजाची नाळ असलेले अद्वितीय असे व्यक्तिमत्व ..श्री दत्त सेवेकरी मंडळ. नारायणपूर चे सेवक असलेले अजित भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ते अनाथाश्रम, बाल वसतिगृह, वृद्धाश्रम या ठिकाणी अन्नदान, वस्रदान करत असतात. यावर्षी माञ ज्ञानदान करण्याचे कौतुकास्पद कार्य त्यांनी केले. आपल्या मार्गदर्शन पर भाषणात त्यांनी विद्यार्थी मित्रांना वाचन, लेखन, मनन, चिंतन आणि अध्ययन सर्व विषयावर बोधपर वक्तव्य केले. तसेच त्यांच्या पत्नी सौ. शितल मेदनकर यांनी देखील आपल्या पतीच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. तसेच दत्त सेवेकरी संदिप भाऊ गायकवाड यांनी देखील अजितभाऊ आणि शितलताई त्यांच्या या ज्ञानदान कार्याचे मनापासून कौतुक, अभिनंदन केले.आरोग्य दायी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिलेली भाषण मालिका “व्यासपीठावरील दीपस्तंभ”ही पुस्तिका नक्कीच वक्तृत्व, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेख करावा अशीच आहे.


वाढदिवसा निमित्त होणारा अनाठायी खर्च टाळून त्यांनी केलेले ज्ञानदान कार्य नक्कीच सकारात्मक असेच म्हणावे लागेल. यावेळी शाळेतील सूत्रसंचालन हे सौ. शितल कड मॅडम यांनी केले तर शुभेच्छा, सदिच्छा, संयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. भालचिम सर यांनी केले.

या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री. राजू पानसरे (मा. अध्यक्ष शालेय समिती निघोजे), श्री संदीपभाऊ गायकवाड, श्री बापू गायकवाड, श्री.सुहास भोसले (अध्यक्ष, शालेय समिती) दत्त सेवेकरी भूषण तुपे, युवा नेते सम्राट तुपे, रोशन तुपे, श्री.श्रीकांत महाळूंगकर, श्री. गणेश येळवंडे, रोहित भोसले, शर्वरी आणि निशांत अजित मेदनकर हे उपस्थित होते. महिलांमध्ये सौ. निर्मलाताई तुपे , सौ.संगीताताई भोसले, सौ.अर्चनाताई भोसले उपस्थित होते.
अतिशय उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.

Previous articleमहाळूंगे येथील जिल्हा परिषद शाळेत अजित मेदनकर यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा : पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक
Next articleआंबेगावच्या नऊ प्राथमिक केंद्रात महाआरोग्य शिबिर मंचर येथे रक्तदान शिबिर