मेदनकरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अजित मेदनकर यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा : पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक

चाकण- मेदनकरवाडी नगरीचे सुपुत्र व सध्या भोसरी येथे स्थायिक असलेले संगणक अभियंता श्री अजित शेठ लक्ष्मण मेदनकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या अर्धांगिनी सौ शितल अजित मेदनकर सांडभोर यांनी लिहिलेले ‘व्यासपीठावरील दीपस्तंभ’ पुस्तकाचे वाटप शाळेतील शंभर विद्यार्थ्यांना करण्यात आले. श्री अजित मेदनकर हे अध्यात्मिक वारसा असलेले व समाजाची नाळ असलेले अद्वितीय असे व्यक्तिमत्व श्री दत्तगुरु सेवा समिती नारायणपूर चे सेवक असलेले अजित भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ते अनाथाश्रम, बाल वसतिगृह, वृद्धाश्रम या ठिकाणी अन्नदान, वस्रदान करत असतात. यावर्षी माञ ज्ञानदान करण्यासाठी त्यांच्या सौभाग्यवती शीतल अजित मेदनकर यांनी लिहिलेली “व्यासपीठावरील दीपस्तंभ” पुस्तक विनामूल्य वितरीत करून गावात आता पर्यंत कधीही न झालेला वाढदिवस सोहळा केला यात शंका नाही.यावेळी आपल्या मातीशी गावाशी असलेली आपुलकी,प्रेम ,जिव्हाळा यामुळे वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत शाळेतील शंभर विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन आपल्या वाढदिवसाची एक अनोखी भेट त्यांनी दिली .

या कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या मातोश्री श्रीमती शकुंतला मेदनकर ,त्यांचे बंधू श्री अमित मेदनकर(जगद्गुरु प्रतिष्ठान),श्री विजय मेदनकर ग्रामपंचायत सदस्य, श्री संजय मेदनकर , श्री शंकर मेदनकर ,श्री नवनाथ भुजबळ, विश्वजीत मेदनकर , श्री गणेश वाजे,सौ चैताली मेदनकर ,अजितभाऊ यांची मुले निशांत आणि शर्वरी उपस्थित होती. आपल्या खडतर आयुष्यात जीवन व्यतीत करीत असताना आपल्या गावाशी समाजाशी व आपल्या शाळेशी वेगळ्या प्रकारचे नातं अजित भाऊंनी जोडलेले आहे, त्याची प्रचिती आज शाळेमध्ये आली. ज्ञानदान हे अन्नदानापेक्षा श्रेष्ठ आहे अन्नदान हे त्या दिवसापूरते , क्षणिक तृप्तीने भरलेले असते परंतु ज्ञानदान हे आजीवन असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. धनाची चोरी करता येईल पण ज्ञानाची चोरी कुणाला करता येणार नाही म्हणूनच ज्ञान हे सर्व श्रेष्ठ दान असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.असा कार्यक्रम यापूर्वी या शाळेत आजपर्यंत कुणीही न केल्याचे गौरवोद्गार श्री कुटे सरांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात सांगितले.

यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. विद्यार्थ्यांनी त्यांना औक्षण करून, वाढदिवसाचे गीत गायन करून शुभेच्छा दिल्या. सर्वांचे आभार मानताना कृतज्ञ तेची जाणीव त्यांच्या वक्तव्यात होती. ज्ञान दिल्याने वाढत असतं म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे नेतृत्वाचे गुण त्यांच्यामध्ये यावेत म्हणून “व्यासपीठावरील दीपस्तंभ” ही भाषण मालिका १०० पुस्तके त्यांनी भेट दिली.

अजित भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .एक वेगळा आगळा उपक्रम तुम्ही शाळेत राबवला व समाजाला आदर्श निर्माण करून दिला.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ राजश्री बेदरकर,शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक श्री तुकाराम कुटे, श्री रिठे रामदास , श्री सुखदेव गायकवाड ,श्री अन्सार पटेल सर, सौ जयश्री पिंगळे ,श्रीमती उमा जवकर, सौ बेबी सर्जीने, श्रीमती मालती कड व इतर सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते

Previous articleमेदनकरवाडी  येथील जिल्हा परिषद शाळेत अजित मेदनकर यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा : पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक
Next articleसुरेश (भाऊ) भोसले यांची कोरेगावमुळ विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड