आदिवासींच्या विकासामध्ये तरुणांची भूमिका महत्त्वाची -डाॅ.अमोल वाघमारे यांचे प्रतिपादन

मोसीन काठेवाडी,घोडेगाव

घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आदिवासी विकास या विषयावर दोन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.

या व्याख्यानमालेत पाहिले व्याख्यान योगेश खंदारे, कार्यालय अधिक्षक, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,घोडेगाव यांचे आदिवासी विकास या विषयावर आयोजित करण्यात आले होते.त्यांनी आदिवासी विकास आणि तसेच आदिवासी समाजासाठी असणारे कायदे याबद्दल मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे आदिवासी विकासाच्या वैयक्तिक व सामूहिक विविध योजनांची माहिती त्यांनी दिली.आदिवासी विकास होणे ही काळाची गरज असून त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन त्यांनी केले.

दुसरे व्याख्यान डॉ.अमोल वाघमारे,सचिव,आदिम संस्कृती, अभ्यास,संशोधन व मानव विकास केंद्र,घोडेगाव यांचे संविधान,लोकशाही,शासन प्रणाली आणि आदिवासी विकास या विषयावर आयोजित करण्यात आले होते.त्यांनी आपल्या भाषणात लोकशाही आणि संविधान हे संपूर्ण भारतीयांसाठी अत्यंत महत्वाचे आहे असे पटवून दिले.आदिवासी बांधव हा अजूनही आपल्या विकासासाठी झगडत आहे.आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आपण नेहमी सकारात्मक असले पाहिजे,असे त्यांनी सांगितले.आदिवासी समाजाने उच्च शिक्षण घेऊन आपला विकास करणे महत्वाचे आहे, असे पुढे त्यांनी विद्यार्थ्याना सांगितले.तसेच युवक हा वयाने नाही तर विचार आणि कृतीतून युवक ठरतो.त्यामुळे आदिवासी विकासात तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.या व्याख्यानमालेत एकूण 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर यांनी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब गव्हाळे,वाणिज्य विभागप्रमुख डॉ.प्रभाकर मोकळ, इंग्रजी विभागप्रमुख डॉ.वल्लभ करंदीकर,प्राध्यापक सोमनाथ जगताप, डॉ.पुरुषोत्तम काळे,पोपट माने,सचिन घायतडके इ.उपस्थित होते.प्रास्ताविक संतोष खरात यांनी तर सूत्रसंचालन डॉ.माणिक बोऱ्हाडे यांनी केले.सुनील नेवकर यांनी आभार मानले.या व्याख्यानमालेचे आयोजन प्रणिता घोडेकर व संतोष खरात यांनी केले.

Previous articleगोनवडी येथे हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
Next articleबी डी काळे महाविद्यालयात लोकशाहीचा जागर मताधिकाराचा या विषयावर ऑनलाईन व्याख्यान संपन्न