घोडेगाव पोलिस स्टेशन येथे महिलांसाठी आयोजित हळदीकुंकु कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मोसिन काठेवाडी,घोडेगाव

घोडेगाव पोलीस स्टेशन,महिला पोलीस पाटील व महिला दक्षता समिती तसेच पोलीस स्टेशन स्टाफ यांच्या कुटुंबातील महिलांकरिता हळदीकुंकु कार्यक्रम घोडेगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी साहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने,पोलिस उपनिरिक्षक अनिल चव्हाण, किशोर वागज, सतिश डौले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम असंख्य महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

या प्रसंगी घोडेगावचे सरपंच अश्विनी तिटकारे, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा रत्ना गाडे, कोळवाडी कोटमदराचे आदर्श सरपंच शुभांगी काळे,काळेवाडी दरेकरवाडीचे धडाडीचे उपसरपंच मंगल जैद,शरद सहकारी बँकेचे संचालिका रुपाली झोडगे,माधवी कर्पे,पोलिस पाटील मंगल काळे,आंबेगाव गावठाणचे सरपंच प्रमिला घोलप, शुभांगी बेल्हापुरकर,स्वप्ना काळे,डॉ मानिक पोखरकर,अशा काळे,म.पो.ना सरला सुरकुले,म.पो.कॉ भाग्यश्री भोर,म.पो.हवा मनीषा तुरे,म.पो.ना संगीता मधे अदि सह सर्व महिला पोलिस पाटील,दक्षता समितीच्या सर्व महिला उपस्थित होत्या.शेवटी महिलातर्फे साहय्यक पोलिस निरिक्षक जीवन माने यांचे आभार मानले.

Previous articleशिवनेरी किल्ल्यावर माजी सैनिकांना मानवंदना करण्याची संधी मिळावी – आमदार बेनके
Next articleगुन्हेगारी प्रवृत्तीच्या कंत्राटदारांना अधिकारी वर्गाने अभय देवु नये: महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाची मागणी