प्रा. डॉ. संदीप सांगळे विक्रमी मतांनी विजयी

दिनेश पवार:दौंड

शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. संदीप विठ्ठलराव सांगळे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्या शाखेअंतर्गत मराठी अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी झाले. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ निवडणुकीत सर्वाधिक मते घेणारे ते एकमेव उमेदवार ठरले आहेत .

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नुकत्याच संपन्न झालेल्या मराठी अभ्यास मंडळाच्या निवडणूकीत डॉ. संदीप सांगळे यांनी हे नेत्रदीपक यश प्राप्त केले. पुणे विद्यापीठ परिक्षेत्रातील पुणे अहमदनगर, आणि नाशिक जिल्ह्यामधील सर्व महाविद्यालयातील मराठीच्या विभाग प्रमुखांनी या निवडणूक मतदानात सहभाग घेतला.

डॉ. संदीप सांगळे यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, सचिव अरविंददादा ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नवले, स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण व संस्थेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. संदीप सांगळे यांचे अभिनंदन केले.

Previous articleपत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या लातूर जिल्हा निमंत्रकपदी संगमेश्वर जनगावे यांची नियुक्ती
Next articleनवयुग प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन