काळे महाविद्यालयात भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

घोडेगाव- येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी. डी.काळे महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने समाज माध्यमांसाठी लेखन कौशल्ये या विषयावर प्रा.डाॅ.जागृती बधान यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘समाजमाध्यमाच्या या आजच्या युगात फेसबुक, इन्स्टाग्राम यांचा वापर सर्रास केला जातो,धोक्याबरोबर या माध्यमांचे फायदे सुद्धा आहे. त्यामुळे या माध्यमांचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करून त्यात करिअरच्या संधी कशा मिळतील याकडे विद्यार्थ्यांनी पाहाव’असे त्या म्हणाल्या.
‘समाजमाध्यमात लिहिताना काय काळजी घ्यावी?वाचक वर्गाला लक्षात घेऊन लेखनात नाविन्य असावं, सातत्य असावं, त्याचबरोबर करिअरच्या दृष्टीने या माध्यमातून लेखन करून आपण पैसे कमवू शकतो. त्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची काळजी घ्यावी. या माध्यमासाठी लेखन आकर्षक असावे. लेखन कमीत कमी शब्दात परंतु प्रभावी असावे. योग्य शब्दांची निवड करावी. सामाजिक व राजकीय भान असणाऱ्या लेखकांची सोशल मिडियाला गरज आहे. लेखनात वाङ्मयचौर्य टाळावे.देश व विदेशातील खेळ,खेळाडू, दिनविशेष, महापुरुषांच्या जयंती,पुण्यतिथी इ.बद्दल माहितीपर लेखन हवे.ते समाजातील नवीन पिढीला हवे असते.असे सांगून फेसबुक, यू ट्यूब आणि ब्लॉग,ग्राफिक्स लेखन,जाहिरात लेखन इ.ठिकाणी उत्तम व चौफेर वाचन,लेखन,प्रगल्भ व्यक्तीमत्व इ.मुळे सोशल मिडियात करिअर करून चांगले उत्पन्न मिळविण्याचे ते एक साधन आहे.त्याचबरोबर जाहिरात क्षेत्रातही विद्यार्थ्यांना उत्तम संधी आहे. सोशल माध्यमावरील विविध प्रकारचे लेखन कसे करावे, या बद्दलची माहिती डॉ.जागृती बधान यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह सांगितली.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

या प्रसगी भिगवण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव वाळुंज,डाॅ. माणिक बोराडे इ.उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.पुरुषोत्तम काळे यानी केले तर प्रा.पोपट माने यांनी आभार मानले.

Previous articleजिजाऊ माँसाहेबांच्या चरित्रग्रंथात आजही हजारो शिवबा घडविण्याची ताकद – वैशाली मुके
Next articleसावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व्याख्यान