माध्यमिक शाळांमध्ये  निर्भया जनजागृतीची गरज – प्रा.सुरेश वाळेकर

उरुळी कांचन

विद्या विकास मंदिर यवत या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात युवक युवतींना पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य संस्थेच्या माध्यमातून सतर्क निर्भया जनजागृती अभियान मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रा.सुरेश वाळेकर यांनी शालेय मुलांना निर्भया जनजागृती बद्दल विशेष मार्गदर्शन विद्या विकास मंदिर यवत (ता.दौंड) या ठिकाणी केले.
याप्रसंगी शाळेचे प्राचार्य मासाळकर सर, प्रा.रेखा चितळकर, प्रा.गद्रे सर, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष विजय तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.

यामध्ये प्रामुख्याने मुलींनी स्वताहाचे स्वसंरक्षण कसे करावे,कायदा सुव्यवस्थांची माहिती, दंडात्मक होणारी शिक्षा व कलमांची माहिती. रोड रोमियोंचा बंदोबस्त, बेसिस्तपणा, मारामारी, अशा घटना शाळा महाविद्यालय, होस्टेल, कंपनी जास्त गर्दीची ठिकाणे, रेल्वे स्टेशन, बस स्टँड अशा ठिकाणी युवती व महिला सुरक्षित नसतात यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन प्रा. सुरेश वाळेकर यांनी केले.

Previous articleयवत खुटबाव मार्गावर भीषण अपघातात दोघांचा कार खाली चिरडून मृत्यु ,एक जखमी
Next articleहॉटेल संस्कृतीचे महाराष्ट्रातील लोकप्रिय कॉमेडी वेबसिरीस चांडाळ चौकटीच्या करामती फेम मधील कलाकार बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव यांच्या उपस्थितीत उदघाटन संपन्न