आपली माती क्रीडा प्रबोधनीच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत घवघवीत यश

रोहन सावंत,चाकण

भोसे (ता.खेड) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन माध्यमिक विद्यालय वडकी (ता.हवेली ,जि.पुणे ) या ठिकाणी २० डिसेंबर २०२२ रोजी जिल्हास्तरीय शालेय खो – खो स्पर्धा पार पडल्या .या स्पर्धेत आपली माती क्रीडा प्रबोधनी वाघाळेच्या खेळाडूंनी विविध प्रशालेचे प्रतिनिधित्व करताना घवघवीत यश संपादन केले .

यामध्ये खेड तालुक्यातील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसे प्रशालेचे १९ वर्ष वयोगटात खेड तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची विभागस्तरीय खो- खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे . तसेच शिरूर तालुक्यातून न्यू इंग्लिश स्कूल मलठण १७ वर्ष वयोगटात शिरूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना पुणे जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला.अशी माहिती आपली माती क्रीडा प्रबोधनी वाघाळेचे संस्थापक राज्य प्रशिक्षक धीरज दंडवते यांनी दिली .

सर्व विजयी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतूक करण्यात आले व विभागस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या .

Previous articleरक्षाविसर्जन नदीच्या पात्रात न करता वृक्षारोपण टिळेकर परिवारचा स्तुत्य उपक्रम
Next articleउरूळी कांचन येथील पद्मश्री मणीभाई देसाई महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन सुभाष जगताप यांच्या हस्ते संपन्न