रक्षाविसर्जन नदीच्या पात्रात न करता वृक्षारोपण टिळेकर परिवारचा स्तुत्य उपक्रम

उरुळी कांचन

पूर्व हवेली तालुक्यातील टिळेकर वाडी येथील टिळेकर कुटुंबातील आदर्श माता व श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे वरिष्ठ अधीकारी सदाशिव बाबुराव टिळेकर यांच्या मातोश्री तसेच हवेली तालुक्याच्या माजी पंचायत समीती सदस्य संगीता सदाशिव टिळेकर यांच्या सासुबाई चंद्रभागा बाबुराव टिळेकर यांचे वयाच्या ९५ वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. अंत्यविधी नंतर नदीच्या वाहत्या पाण्यात होणार्या रक्षा विसर्जनाच्या विधीमुळे नदीप्रदुषणात भर पडते ही गोष्ट ओळखुन सामाजीक बांधीलकी जपत नदी प्रदुषण रोखण्यासाठी व पर्यावरण जोपासण्या साठी अस्थी व रक्षा यांचे नदीत विसर्जन न करता. त्याचा वापर करून त्यांनी आपल्या शेतात कल्पवृक्ष म्हणुन ओळखल्या जाणार्या नारळ वृक्षांची लागवड केली व पर्यावरण वाचवण्याचा अनोखा संदेश दिला.

या वेळी य.स.सा.कारखान्याचे मा.संचालक व हवेली तालुक्याचे जेष्ठ नेते लक्ष्मण सिनाभाऊ टिळेकर, मा.उपसरपंच व राष्ट्रवादी काॅग्रेस ओबीसी सेल चे अध्यक्ष सुभाष टिळेकर, पोलीस पाटील विजय टिळेकर, मा.सरपंच निता टिळेकर, ग्रामपंचायत सदस्या सुषमा टिळेकर, राष्ट्रवादी काॅ.किसान सेलचे अध्यक्ष रोहीदास टिळेकर ,श्रीदत्त सेवा ट्रस्टचे सदस्य बबनराव टिळेकर, उद्योजक हर्षल टिळेकर हे उपस्थित होते.

तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे व ज्यांच्या संकल्पनेतुन हा उपक्रम राबवला गेला ते मा.व्हा.चेअरमन राजेंद्र तुळशीराम टिळेकर व श्रीदत्त सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष संतोष दगडु टिळेकर यांनी या वेळी टिळेकर कुटुंबाचे आभार मानले व ईथुन पुढे प्रत्येक कुटूंबाने अशा समाज उपयोगी गोष्टींचा अंगीकार करावा अशी भावना व्यक्त केली जेणे करून नदी प्रदुषणाला आळा बसेल व पर्यावरणाचे संर्वधन होईल .

Previous articleबिडी कामगारांच्या किमान वेतन संदर्भात लेबर ऑफिसकडून कारवाई करणार
Next articleसरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात भारतीय मजदूर संघाचा २८ डिसेंबर रोजी विधानसभा वर मोर्चा