Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
नारायणगाव – (किरण वाजगे)
जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथील लांडगे मळा परिसरात अज्ञात चोरट्यांनी रात्रीतून योगेश नरवडे, अनंथा नरवडे,शहाजी नरवडे यांची तीन बंद घरे शुक्रवारी दि. ०९ रोजी मध्यरात्री फोडली. या घटनेत सुमारे पाच लाख रुपयांचा सोने-चांदीचा दागिन्यांचा ऐवज व इतर रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.
यामुळे लांडगे मळा, वडगाव कांदळी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.एकीकडे चोरट्यांची भीती आणि दुसरीकडे बिबट्याची दहशत यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे.
स्थानिक प्रशासनाने याठिकाणी लक्ष देण्याची गरज असून घटनास्थळी नारायणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.
दरम्यान नारायणगाव, वारूळवाडी, मांजरवाडी, वडगाव परिसरात यापूर्वी देखील अनेकदा बंद घरांचे कडी कुलूप तोडून लाखो रुपयांच्या ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबवला आहे. अशा प्रकारे सातत्याने वाढलेल्या चोऱ्या लक्षात घेता नागरिकांसह पोलिसांनी देखील सतर्क राहण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.