अन्याय अत्याचार निर्मुलन समितीची पुणे जिल्हा कार्यकारणी निवड जाहीर

उरुळी कांचन

समाजात कुठल्याही पदावर कुठल्याही संघटनेत कार्यरत असताना सामाजिक जाणीव ठेवून निरपेक्षपणे काम करावे. समाज तुमच्या कामाची दखल घेत असतो. मिळालेल्या पदाच्या माध्यमातून पदाला न्याय देण्याचा सकारात्मक विचार ठेवावा असे प्रतिपादन अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा सुरेश वाळेकर यांनी पुणे जिल्हा अन्याय अत्याचार निर्मुलन समिती कार्यकारिणी पदनियुक्ती वाटप प्रसंगी उपस्थित नवनियुक्त पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

पुणे जिल्हा भागातील सर्व सामान्य पुरूष महिलांना कायदेशीर मार्गाने न्याय मिळुन देण्यासाठी पुणे जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र जाधव यांचे मार्गदर्शनानुसार पुणे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर सर यांचे अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

यावेळी सचिन दिलीप साबळे यांची (पुणे शहराध्यक्षपदी), अमृता कुलकर्णी यांची (पुणे शहर सरचिटणीसपदी), चित्रा अनिल घाडगे यांची (पुणे शहर संघटकपदी), प्रतिमा चंद्रकांत शिंदे यांची (पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षपदी), अर्चना संजय सरोदे यांची (पुणे जिल्हा उपाध्यक्षापदी), मनिषा प्रमोद ढवळे यांची (पुणे जिल्हा उपाध्यक्षापदी), मनिषा सोमनाथ रायकर यांची (अध्यक्षा महिला दौंड तालुका), मनिषा लक्ष्मण खुटाळे यांची (दौंड तालुका महिला उपाध्यक्षा), संतोष गोटीराम लिंभोरे यांची (पुणे जिल्हा संघटक प्रमुखपदी), सचिन शरद सावंत यांची (पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुखपदी), शोभा हरगुडे याची (हवेली तालुका अध्यक्षपदी), समीर शेख यांची (पुणे शहर उपाध्यक्षपदी) इत्यादी नियुक्त्या करण्यात आल्या. सदर निवडीचे पत्र राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रवींद्र जाधव आदेशानुसार पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा. सुरेश वाळेकर सर यांच्या शुभहस्ते पुणे जिल्हा कार्यकारणीचे नियुक्त पत्र वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन सावंत यांनी केले. आभार प्रदर्शन प्रतिमा शिंदे यांनी केले. लवकरच पुणे जिल्हा व शहर कार्यकारिणीचा कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याचा ठराव या वेळी करण्यात आला. राष्ट्रगिताने बैठकीची सांगता करण्यात आली.

Previous articleमराठी पत्रकार परिषदेच्या कोकण विभागीय सचिवपदी पनवेलचे अनिल भोळे यांची नियुक्ती
Next articleजुन्नर तालुक्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच : वडगाव कांदळी येथे तीन घरे फोडली लाखो रुपयांच्या ऐवज लांबवला