क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी कंपनीने सीएसआर फंडातून एक हजार दिव्यांग बांधवांना केली मदत

कुरकुंभ, सुरेश बागल

पाटस ( ता.दौंड येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने त्रिमूर्ती मंगल कार्यालयात महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून व क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या सीएसआर प्रकल्प अंतर्गत १००० दिव्यांग बांधवांच्या उपस्थित दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल व व्हीलचेअर व अंधांना काट्या व शूज वाटप करण्यात आले.तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले.

कार्यक्रमाला सन्माननीय उपस्थित महा एनजीओ फेडरेशनचे अध्यक्ष शेखरभाऊ मुंदडा, दौंड तालुक्याचे माजी आमदार – जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष रमेशआप्पा थोरात, दौंडचे आमदार राहूलदादा कुल, क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे चेअरमन कृष्णकुमार बुब , सुहासजी अहिरराव व महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अक्षय महाराज भोसले, अमोल उमरगे, पाटसगावचे माजी सरपंच योगेंद्रबाबा शितोळे ,भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सत्वशील भाऊ शितोळे, ग्रामपंचायत सदस्य माणिकराव चोरमले, सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे (संस्थापक अध्यक्ष- शरदचंद्रजी पवार विचारमंच महाराष्ट्र राज्य ), राजू शिंदे,माजी सरपंच संभाजीराव खडके, डॉक्टर मधुकर आव्हाड, माजी उपसरपंच छगन मस्के,मार्केट कमिटीचे माजी सभापती सागर पाटील शितोळे, प्रहारचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब जगताप,प्रहार संघटना महिला अध्यक्षा निर्मलाताई राऊत, प्रहार तालुका अध्यक्षा शबाना मॅडम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपंग सेल अध्यक्षा लक्ष्मीबाई लोंढे, बबनराव गायकवाड, सारिका भुजबळ, बापू जगताप तसेच भरपूर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. दिव्यांगांना मार्गदर्शन शेखरभाऊ मुंदडा यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब नानवर यांनी केले.

या कार्यक्रमाचे आभार ग्रामपंचायत सदस्य विकासजी कोळपे यांनी मानले. कार्यक्रमाला विशेष सहकार्य हनुमंत शितोळे, शिवाजी म्हेत्रे, एकनाथ वेताळ, आप्पा बोराटे,आबा थोरात ,गव्हाणे भाऊ, रोहिदास भागवत, राज मुलानी, स्वाती भागवत, कोमल भंडलकर, लक्ष्मण चव्हाण यांनी सहकार्य केले होते तसेच या पुढे देखील असेच सहकार्य राहील असे आश्वासन शेखर भाऊ मुंदडा यांनी दिले आहे .कार्यक्रम चांगला व उत्कृष्ठ प्रकारे संपन्न झाला.

Previous articleभारतीय मजदूर संघाच्या मागणीला मिळाले महत्वपूर्ण यश
Next articleमराठी पत्रकार परिषदेच्या कोकण विभागीय सचिवपदी पनवेलचे अनिल भोळे यांची नियुक्ती