पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा

उरुळी कांचन

पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय उरुळी कांचन येथे विज्ञान विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने १ डिसेंबर २०२२ रोजी “जागतिक एड्स दिन” साजरा करण्यात आला.
जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर तरुणांमध्ये जनजागृती व्हावी. हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब भगत व उपप्राचार्य डॉ.अविनाश बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. के. डी. कांचन उपस्थित होते. व त्यांनी जागतिक एड्स दिनानिमित्त पोस्टर प्रेझेन्टेशनचे
उदघाटन केले आपल्या मनोगतातून एड्स या आजारा विषयी माहिती दिली व विद्यार्थ्यांनी या आजाराविषयी जनजागृती करावी असे आव्हान केले. तसेच महाविद्यालयात पोस्टर प्रेसेंटेशन आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रतीक्षा कोद्रे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्वाती मासाळकर यांनी केले.

या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक प्रा. अनुजा झाटे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्याना एड्स विषयी सविस्तर पणे माहिती दिली. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. रविंद्र मुंढे, प्रा. कमारुंनिसा शेख, प्रा. नंदिनी सोनवणे, प्रा, दिपाली चोधरी, प्रा,भोईटे, प्रा,प्रणिता फडके , प्रा. विजय कानकाटे प्रा रेवती आंबेकर हे प्राध्यापक व स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री. प्रदीप राजपूत . श्री.मोरेश्वर बगाडे, व विशालदीप महाडिक, विसनगरकर यांचे सहकार्य लाभले.

Previous articleप्रताप  कांचन यांची युवा सेना हवेली तालुका प्रमुखपदी निवड
Next articleजयश्री मंगवडे यांना राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार प्रदान