हिंगणगावच्या सरपंचपदी अपर्णा थोरात यांची बिनविरोध निवड

उरुळी कांचन

पूर्व हवेली तालुक्यातील हिंगणगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. अपर्णा माऊली थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते सरपंच विद्या थोरात यांचा कार्यकाल संपल्याने सदर पद रिक्त झाले होते. सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया उरुळी कांचनच्या मंडल अधिकारी नूरजहाँ सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सरपंच पदासाठी अपर्णा थोरात याचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नूरजहाँ सय्यद यांनी अपर्णा थोरात यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.नवनिर्वाचित सरपंच अपर्णा थोरात यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उपसरपंच सुभाष गायकवाड, माजी सरपंच अंकुश कोतवाल, माजी सरपंच कुंडलिक अर्जुन थोरात, माजी सरपंच कुंडलिक पाटलोजी थोरात, माजी सरपंच विजय गायकवाड, माजी उपसरपंच सुखदेव कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल थोरात, ग्रामपंचायत सदस्य सागर थोरात, शशिकला पोपळघट, लंका वेताळ, रुपाली गायकवाड, ग्रामविकास अधिकारी सुवर्णा लोंढे, दगडू थोरात, रासप तालुकाध्याध्यक्ष भरत गडदे, दीपक थोरात, काळुराम थोरात, हवेली ता.संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष योगेश शितोळे, शिरसवडी वि.वि.कार्यकारी सेवा सोसायटी संचालक मानसिंग गावडे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष विजय तुपे, शिक्षक सेलचे उपाध्यक्ष तालुका प्रा.सुरेश वाळेकर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावातील गटतट बाजूला ठेऊन विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित सरपंच अपर्णा थोरात यांनी सांगितले.

Previous articleगोरख कौठाळे यांचा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने गौरव
Next articleअतिक्रमणांबाबत लढा देणार – सरपंच परिषद उपाध्यक्ष शशिकांत मोरे