पोलीस स्टेशनला येणाऱ्या प्रत्येकाला समान न्याय देण्यासाठी कटिबद्ध – पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील

दिनेश पवार : दौंड

दौंड शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी रेकॉर्ड वरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे,यासाठी पत्रकार व नागरिक यांचे सहकार्य अपेक्षित आहे,तसेच पोलीस स्टेशन ला येणाऱ्या प्रत्येकाला समान न्याय देण्यासाठी पोलीस कटिबद्ध असल्याचे मत दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची बदली झाल्याने पोलीस स्टेशनचा कार्यभार पाटील यांनी स्वीकारलेला आहे,2017 साली भाऊसाहेब पाटील यांना पोलीस महासंचालक विशेष सन्मान पदक तसेच विशेष सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे.पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारल्याने त्यांनी दौंड शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

Previous articleम्हाळसाकांत सिंचन योजनेच्या ड्रोन सर्वेला प्रारंभ : म्हाळसाकांत योजनेच्या आशा पल्लवित
Next articleमहात्मा फुले मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अविनाश ठाकरे निमंत्रक पदी, गणेश जगताप व सुनील धिवार यांची निवड