सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात भारतीय मजदूर उतरला रस्त्यावर ; दिल्ली तील जंतर मंतर येथे सार्वजनिक ऊद्योगातील कामगारांची तीव्र निदर्शने

कुरकुंभ: प्रतिनिधी ,सुरेश बागल
दि. १७ नोव्हेंबर रोजी भारतीय मजदूर संघाच्या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका, ऐल आय सी, रेल्वे, संरक्षण, खाण ऊद्योग , ऐन टी पी सी ,स्टील , आदी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या सरकार च्या खाजगी करण, स्वःतत्र महामंडळ (CORPORSATION ) धोरण च्या विरोधात भारतीय मजदूर संघांने जंतर मंतर दिल्ली येथे त्रिव निदर्शने करून सरकार च्या धोरणचा विरोध केला. तसेच या वेळी सार्वजनिक क्षेत्रातील ऊद्योगातील सद्यस्थीती व कामगारांच्या विविध समस्या या बाबतीत भारत सरकार ला निवेदन दिले. या वेळी विविध राज्यातील, सार्वजनिक ऊद्योगातील हजारो कामगारांनी सहभागी झाले होते. या वेळी भारतीय मजदूर संघ च्या केंद्रीय पदाधिकारी यांनी सरकार च्या खाजगीकरण, च्या धोरण चा पुर्नविचार करावा अशी मागणी केली आहे.

भारतीय मजदूर संघा च्या महत्वपूर्ण मागण्या

१) सार्वजनिक क्षेत्र , सार्वजनिक उपक्रमातील नवरत्न कंपन्या व सरकारी ऊद्योगातील खाजगी करण थांबवा.

२) आजारी उद्योगांचे पुनर्जीवन करा .

३) प्रतिरक्षा ऊद्योगांचे निगमीकरण (CORPORATION) करू नका.
.
४) सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे एकत्रीकरण करू नका.

५) वीमा कंपनी च्या खाजगीकरणास सक्त मनाई करा.

६) कोल ऊद्योगातील कर्मशीयल माईनिंग प्रक्रियेस प्रतिबंध करावा.

७) सार्वजनिक ऊद्योग , सरकारी ऊद्योगात नोकर भरती सुरू करा.

८) सार्वजनिक ऊद्योगातील व सरकारी ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट करा.

ईतर महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह आणि अवजड ऊद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री श्री. महीद्रनाथ पांडे यांची भेट घेवून निवेदन दिले.
भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळात राष्ट्रीय महामंत्री मा . रविंद्र हिमते, ऐस मल्लेशम, गिरीश आर्या, एम पी सिंह, अशोक शुल्का, श्री. रामनाथ गणेशे, लक्ष्मा रेड्डी, डी. के .पांडे, मुकेश कुमार सिंह, मंगेश देशपांडे, मानत पाल, साधू सिंह, आर वेंलगराव आणि पवनकुमार सहभागी होते.

या आंदोलनात महाराष्ट्रातील सार्वजनिक क्षेत्रातील ऊद्योगातील संरक्षण, बॅंका, ऐल आय सी, रेल्वे, ऊद्योगातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अशी माहिती अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सचिन मेंगाळे यांनी दिली आहे.

Previous articleमॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय बालदिन अविस्मरणीय
Next articleम्हाळसाकांत सिंचन योजनेच्या ड्रोन सर्वेला प्रारंभ : म्हाळसाकांत योजनेच्या आशा पल्लवित