किशोर मुठेकर सलग तीन वेळा नेट परीक्षा उत्तीर्ण

दिनेश पवार ; दौंड

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने सहाय्यक प्राध्यापक पात्रतेसाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा(नेट)सलग तीन वेळा किशोर सुभाष मुठेकर मराठी विषयात उत्तीर्ण झाले आहेत,त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

किशोर मुठेकर यांनी सन २०२०,२०२१,२०२२ मध्ये सलग तीन वर्ष मराठी विषयामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा(UGC-NET) परीक्षेत यश मिळवले आहे‌.याबरोबरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणारी सेट परीक्षा देखील मुठेकर उत्तीर्ण आहेत.सध्या राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, लांडेवाडी,भोसरी, पुणे येथे मुठेकर हे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.त्यांच्या या यशाबद्दल प्रा.डॉ.राजेंद्र ठाकरे,प्रा.डॉ.अतुल चौरे यांनी अभिनंदन केले

Previous articleशरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित कार्तिकी एकादशीनिमित्त ‘विठू माऊली माझी’ कार्यक्रमात राहुल देशपांडे यांच्या गायनाने भक्तांनी अनुभवली पंढरीची वारी
Next articleसरदार वल्लभभाई पटेल जयंती म्हणजे विभूतीपूजा होय – समाजसेवक डॉ रविंद्र भोळे