यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणारा चोरटा पोलिसांकडून जेरबंद

योगेश राऊत

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून फरार असलेल्या शिंदवणे (ता. हवेली) येथील ठगास स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यश भारत शिंदे (वय – १९, रा. शिंदवणे, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिल्या होत्या.

सदर घटनेचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने तपास पथक तयार करून सदर गुन्ह्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाला एका खबऱ्याकडून व तांत्रिक मदतीने माहिती मिळाली कि, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केलेला संशयित आरोपी हा बोरीफाटा (ता. दौंड) येथे येणार असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी सापळा रचून संशयित इसमास शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव वरीलप्रमाणे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तसेच तो वापरत असलेला मोबाईलची पाहणी केली असता तो वरील गुन्ह्यात चोरीस गेलेला मोबाईल असल्याची खात्री झालेने त्याचेकडे अधीक तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. वैदकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी यवत पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल धस यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस उपनिरीक्षक सिद पाटील, पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, अजय घुले, पोलीस नाईक धीरज जाधव यांनी केली आहे.

Previous articleमहाराष्ट्रातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या न्याय, हक्काच्यां मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाची महाराष्ट्र व्यापी मजदूर चेतना‌ यात्रा
Next articleसरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात भारतीय मजदूर संघ घालणार मंत्रालयाला घेराव शिवजन्म भुमीत केला निर्धार