गरजू व वंचितासाठी पाटस ग्रामविकास फाउंडेशनची ‘माणुसकीची दिवाळी

योगेश राऊत ,पाटस

पाटस (ता.दौंड ) येथील पाटस ग्रामविकास फाउंडेशनच्या माध्यमातून यंदाची दिवाळी पाटस परिसरातील अनाथ,दिव्यांग तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांना नवीन कपडे व दिवाळी फराळ देऊन खऱ्या अर्थाने माणुसकीची दिवाळी म्हणून साजरी करण्यात आली.

पोटाची खळगी भरण्यासाठी जिकडे ऊसतोड असेल त्या गावी आपले बिऱ्हाड थाटून प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत ऊसतोड कामगार आपली कौटुंबिक जबाबदारी बिनदिक्कतपणे निभावत असतात.

यांच्या कुटुंबाचीही दिवाळी पाडवा व भाऊबीज साजरी व्हावी याकरिता पाटस ग्रामविकास फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो,गेली ७ वर्षे फाउंडेशन “माणुसकीची दिवाळी” या संकल्पनेतून गरजूंना नवीन कपडे व दिवाळी फराळ,मिठाईचे वाटप करीत आहे,आपल्यातले दोन घास वंचितांच्या पोटात जातील अशा सामाजिक जाणिवांची बांधिलकी जोपासणे ही काळाची गरज असल्याचे मत पाटस ग्रामविकास फाउंडेशन चे अध्यक्ष हर्षद बंदीष्टी यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक विनोद कुरूमकर,अध्यक्ष हर्षद बंदीष्टी,उपाध्यक्ष गणेश जाधव,मार्गदर्शक रविंद्र शाळू,जुनेद तांबोळी,सचिव राजू गोसावी,खजिनदार विठ्ठल वाळुंजकर,कार्याध्यक्ष गणेश शितोळे उपस्थित होते.

Previous articleपारंपरिक रुढी व परंपरा बाजूला ठेवत वडीलांच्या अस्थींचा वापर करत जगताप कुटुंबाने केले वृक्षारोपण
Next articleतळेगाव – चाकण – शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामांला सुरुवात : खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश