दानशूर उद्योजकाने दिली वाढदिवसानिमित्त खंडेरायाचरणी ‘साऊंड सिस्टीम’ भेट

राजगुरूनगर- वाकळवाडी (ता.खेड) येथील श्री.वाळकेश्वर सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष, भोसरी येथील ‘मल्हारी प्रेसिंग’ कंपनीचे मालक, शिवमल्हार भक्त उद्योजक श्री. दशरथशेठ रामभाऊ पवळे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्री क्षेत्र निमगाव खंडोबा मंदिरातील दैनंदिन आरतीसाठी साऊंड सिस्टीम भेट दिली.

यावेळी राज्य पोलिस पाटीस संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, देवस्थानचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, खेड तालुका शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष धर्मराज पवळे, वाकळवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक शंकरराव पवळे, पिंपरी चिंचवड मनपाचे अधिकारी माऊली गोरडे, दत्ता भगत, विजय भगत, प्रमिला पवळे, विजया पवळे, धनश्री पवळे आदि मान्यवर व खंडेरायाचे भगत पुजारी उपस्थित होते.

खंडोबाची दैनिक आरतीला या साऊंड सिस्टिममुळे आता विजेचाही विक्षेप होणार नसल्याचे भगतांनी यावेळी सांगितले. देवस्थानच्या वतीने दानशूर उद्योजक दशरथशेठ पवळे यांचा सन्मान करण्यात आला.

Previous articleपाटस ग्रामविकास फाउंडेशन च्या अध्यक्षपदी हर्षद बंदीष्टी यांची निवड
Next articleगोधडी वर बसून चित्रपट पाहताना वाटलं नव्हतं एवढ्या मोठ्या पडद्यावर आपणही दिसू – खा.डॉ. अमोल कोल्हे