पाटस ग्रामविकास फाउंडेशन च्या अध्यक्षपदी हर्षद बंदीष्टी यांची निवड

योगेश राऊत, पाटस

पाटस (ता.दौंड) येथील पाटस ग्रामविकास फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी श्री हर्षद बंदीष्टी यांची निवड करण्यात आली, संस्थेचे संस्थापक विनोद कुरूमकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले,पाटस पंचक्रोशीतील विविध सामाजिक क्षेत्रात गेली सहा वर्षे समाजोपयोगी अभियाने राबवून फाउंडेशन ने लोकसहभागातून एक आदर्श चळवळ निर्माण केली आहे.

यात पाटस ग्रामतलाव खोलीकरण,तलाव भराव रुंदीकरण,ओढा खोलीकरण, नागेश्वर विद्यालय व जिल्हा परिषदेच्या शाळेतील खेळ मैदान सपाटीकरण,पाटस रेल्वेस्टेशन रस्ता मुरुमीकरण,ग्रामसुरक्षाअभियाना अंतर्गत पाटस परिसरात सुमारे ५० हॅलोजन बसविणे,कोरोना काळात गरजूंना किराणा किट वाटप,बाराही महिने गरजू विद्यार्थ्यांना कपडे व शालेय साहित्य वाटप,सायकल वाटप, परिसरात वृक्षारोपण ,पाटस एस टी स्टँड प्रश्नी उपोषण तसेच पाटस ते हडपसर पीएमपीएमएल बससेवा सुरू होणेकामी सर्व स्तरातून पाठपुरावा या महत्वपूर्ण अभियानांचा समावेश आहे.

नियुक्तिवेळी फाउंडेशन चे गणेश जाधव,जुनेद तांबोळी,गणेश शितोळे, राजू गोसावी,विठ्ठल वाळुंजकर उपस्थित होते.

Previous articleदिवाळीच्या सणानिमित्त शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखरेचे वाटप
Next articleदानशूर उद्योजकाने दिली वाढदिवसानिमित्त खंडेरायाचरणी ‘साऊंड सिस्टीम’ भेट