गोधडी वर बसून चित्रपट पाहताना वाटलं नव्हतं एवढ्या मोठ्या पडद्यावर आपणही दिसू – खा.डॉ. अमोल कोल्हे

नारायणगाव : (किरण वाजगे)

लहानपणी गोधडी वर बसून ओपन थिएटरमध्ये चित्रपट पाहत होतो त्यावेळी वाटले नव्हते की, एवढ्या मोठ्या पडद्यावर आपण देखील मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसू, असे उद्गार जेष्ठ कलाकार व खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

डॉ. कोल्हे हे त्यांच्या जन्मगावी नारायणगाव येथे “शिवप्रताप गरुडझेप” या चित्रपटाच्या प्रमोशन साठी येथील लक्ष्मी सिनेमागृहात आले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना आपल्या लहानपच्या आठवणी सांगितल्या.

संपुर्ण जगाने केलेली वाहवा आणि घरच्या माणसांनी दिलेली शाबासकी यात वेगळेपणा असतोच, शिवाय जेव्हा महाराज साकारायला मिळतात त्यापुढे कोणतीही खुर्ची गौण आहे हे सांगायला सुद्धा डॉ कोल्हे विसरले नाहीत.

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आहेत ज्यांना तिकीट काढून सिनेमा गृहात येता येतं नाही अशा गरीब मुलांना चित्रपट गृहात मोफत चित्रपट दाखवण्याचं काम राज्यभरातील काही संस्था व काही व्यक्ती करत असून त्यामुळे महाराजांचा विचार सर्वत्र पोहचवला जातोय. याबद्दल डॉ कोल्हे यांनी आणि सर्वांचे आभार व्यक केले.

याप्रसंगी आमदार अतुल बेनके, माजी आमदार बाळासाहेब दांगट, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अनिलतात्या मेहेर, उपाध्यक्ष सुजित खैरे, विघ्नहर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे, जिल्हा बँकेच्या संचालिका पुजा बुट्टे, माजी नगराध्यक्ष शाम पांडे, डॉ. सदानंद राऊत, सुरज वाजगे, रोहिदास केदारी, मकरंद पाटे, राजेंद्र कोल्हे,अतुल आहेर, श्रेयस झोडगे, आशिष हांडे आदी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व प्रेक्षक उपस्थित होते.

Previous articleदानशूर उद्योजकाने दिली वाढदिवसानिमित्त खंडेरायाचरणी ‘साऊंड सिस्टीम’ भेट
Next articleसुनिल थोरात यांना प्रदान राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार मा.मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते प्रदान