गाड्यांचे सायलन्सर चोरी करणारी टोळी अखेर जेरबंद

योगेश राऊत पाटस

यवत , सासवड , जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील कॅरी टेम्पो व इको गाड्यांचे महागडे सायलन्सर चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात यवत गुन्हे शोध पथकातील पोलिसांना यश आले आहे . या टोळीकडून आत्तापर्यंत ४ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २१/०९/२०२२ रोजी यवत येथील भुलेश्वर मार्केट समोर ता . दौंड जि . पुणे गावचे हद्दीत फिर्यादी सतीश द्वारकादास लोंढे ( वय ४८ ) यांनी श्री भुलेश्वर गॅस एजन्सी समोर लावलेला त्यांचा मारुती सुझुकी कॅरी मॉडेलचा टेम्पो क्रमांक एम . एच . ४२ बी . एफ . ००५४ याचा सायलेन्सरज्याची किंमत ५० हजार रूपये होती . त्याचे नट बोल्ट खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने मुद्दाम लबाडीचे इराद्याने चोरून नेले होते . याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे दिनांक २१/०९/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता .

यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने यवत परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे व रेकॉर्डवरील आरोपी चेक करून सदरील फुटेजच्या आधारे त्यातील संशयित इसमाची माहिती घेण्यास सुरुवात केली होती . दिनांक ०३/१०/२०२२ रोजी यवत गुन्हे शोध पथकास गणेशनगर धायरी येथील रोहित अडसूळ याने त्याचा साथीदार गौरव होगले याचे सोबत सदरचा सायलेन्सर चोरीचा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाल्याने सदर पोलीस पथकाने गणेशनगर धायरी येथे जाऊन संशयित इसम १ ) रोहित रंगनाथ अडसूळ ( वय १९ रा .गणेशनगर धायरी मुळ रा . तडवळ ता.जि.उस्मानाबाद ) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा मित्र गौरव होगले याचे सोबत केला असल्याची कबुली दिली व चोरून आणलेले सायलेन्सर हडपसर येथील भंगार व्यावसायिक २ ) तसब्बूर युसूफ मलिक सध्या ( रा . रामटेकडी मूळ रा . मंडली ता.जि मेरठ राज्य उत्तर प्रदेश ) याला विकले.असल्याचे सांगितले .

पोलिसांकडून त्यासही सदर गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले असून सदर आरोपींनी यवत , सासवड , जेजुरी या परिसरातील एका मारुती सुझुकी कॅरी टेम्पोचा व तीन मारुती सुझुकी इको गाडीचे एकूण ४ गुन्हे केले असल्याचे सांगितले आहे . सदर गुन्हयातील दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीस मा . प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दौंड यांनी दिनांक १०/१०/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आले आहे .

सदरची कामगिरी मा . पोलीस अधीक्षक डॉ . अभिनव देशमुख सो , अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते , उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार , पोलीस पोलीस हवालदार कृष्णा कानगुडे , निलेश कदम , गुरू गायकवाड , पोलीस नाईक अक्षय यादव , गणेश कुतवळ सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन गायकवाड , पोलीस मित्र निलेश चव्हाण यांनी केली आहे .

Previous articleमराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे अधिवेशन म्हणजे पिंपरी चिंचवड चिंचवडचा गौरव : मा.उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleग्रामीण भागातील मुलांच्या कला गुणांना वाव देणाऱ्या नागेश्वर मित्र मंडळाचे काम कौतुकास्पद – मा. आमदार रमेश थोरात