उरुळी कांचन येथील श्रीकृष्ण मंदिरात नवरात्र महोत्सव निमित्ताने देवपूजा प्रसादवंदनचे आयोजन

उरुळी कांचन

भक्ती कशी असावी भक्ती म्हणजे प्रेम बोलीजे आपल्या अतंकरणात असणाऱ्या ईश्वराप्रति असणाऱ्या प्रेमाला भक्ती म्हणतात. भक्तीचे प्रति असणाऱ्या प्रसंगाचे सामाजिक जीवनात वावरत असताना आपल्याला बरेच अनुभव येतात परंतु आपल्याला ज्ञान नसल्याने ते आपल्याला समजत नाही. कुटुंबातील असणाऱ्या व्यक्ती बदल आदर यालाही भक्ती म्हणतात. असे प्रतिपादन महंत जयराज शास्त्री साळवाडी यांनी व्यक्त केले.

उरुळी कांचन येथे श्रीकृष्ण मंदिर याठिकाणी नवरात्र महोत्सव निमित्ताने देवपूजा प्रसादवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी उपस्थितीत सदभक्तांना मार्गदर्शन करताना जयराज शास्त्री बोलत होते.

श्रीकृष्ण सेवा मंडळाचे सर्व सदभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी तपस्वीनी उज्वला शास्त्री ह्या शास्त्री परिक्षेत उत्तीर्ण झाल्याने सर्व सद भक्ताच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

यावेळी प.पु.ई.सुबोधमुनी धाराशिवकर (उरुळी कांचन), महंत प्रभाकर पुणेकर (गणेशपेठ पुणे), महंत कृष्णराजबाबा शास्त्री (शिक्रापूर), महंत जयराज शास्त्री (साळवाडी), महंत हरिपाळ बाबा (फलटण), महंत विद्याधरबाबा शहापूरकर (कोरेगामुळ), महंत संदीपबाबा दिवाकर अंकुळनेरकर (जातेगांव), महंत राहेरकर बाबा (तरडगांव), तपस्वीनी अविताताई कपाटे (उरुळी कांचन) याठिकाणच्या विशेष करुन छिनस्थळी, क्षेयरवाज, तांबूळ, टिका, काष्ट, वस्त्रप्रसाद, केशकळाप असे वैशिष्ट्यपूर्ण देवपूजा प्रसादवंदन सदभक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

Previous articleनाभीक महामंडळाकडुन राहुल दिवेकर यांचा गुणगौरव व सत्कार
Next articleमांजरवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी