प्रदीप क्षीरसागर याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

नारायणगाव : (विशेष प्रतिनिधी)

नारायणगाव येथील भैरवनाथ मंदिराचे पाठीमागे राहणाऱ्या एका महिलेच्या व तिच्या मुलीला अडवून तिचा हात पकडून व चॉकलेटचे आमीष दाखवून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याबद्दलना रायणगावातील व्यापारी प्रदीप क्षीरसागर याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३५४, ३५४ (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नारायणगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार २४ वर्षीय फिर्यादी महिला दि. २१ रोजी सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सासूच्या रूमवरून पायी चालत त्यांच्या घरी जात होती.

नारायणगाव येथील खैरे हॉस्पिटलच्या पुढे बाजारतळा जवळ प्रदीप क्षीरसागर याने त्या महिलेच्या मुलीला चॉकलेट खाण्यास देऊन त्या दोघी घरी जात असताना पाठीमागून त्याच्या मोटरसायकल वर येऊन माझ्या गाडीवर बस असे क्षीरसागर त्या महिलेला म्हणाला. संबंधित महिलेने गाडीवर बसण्यास नकार दिल्याने त्याने मोटरसायकल वरून खाली उतरून फिर्यादी महिलेचा हात धरून जबरदस्तीने त्याच्या जवळील मोटार सायकलवर बसू लागल्याने त्या महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न झाली असे कृत्य केले. म्हणून फिर्यादी महिलेने नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे या तक्रारीवरून प्रदीप क्षीरसागर याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.

Previous articleडिजिटल मिडिया परिषदेच्या शाखा राज्यभर होणार
Next articleबी डी काळे महाविद्यालयात रानभाज्या व रानफळे प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न