खासदार अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने अनाथ आश्रमात शालेय वस्तूंचे वाटप

चाकण – राष्ट्रवादी काॕग्रेसचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने शेल पिंपळगाव येथे अनाथ आश्रमास वह्या,पेन, शालेय उपयोगी वस्तू व फळे वाटप करण्यात आले तसेच संगमवाडी येथे महादेव मंदिरामध्ये अभिषेक करून त्यांच्या उदंड निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजी राजे मोहिते, शेल पिंपळगावचे सरपंच विद्याताई मोहिते, शेलगावचे सरपंच रंजीत हांडे, संदीप आप्पा मोहिते, सुनिताताई मोहिते, नितीन आबा मोहि,ते मा सरपंच संजय शेठ मोहिते, संजय शेठ थोरवे, विलास मोहिते, श्रेयस झोडगे, ऋषिकेश पानसरे,भरत पोतले, शुभम वर्हाडी,विशाल भुजबळ, प्रणव हांडे, मा चेअरमन विलास मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते

Previous articleवीज ऊद्योगातील कंत्राटी कामगार उतरणार रस्त्यावर
Next articleखुशाल कुंजीर यांची हवेली तालुका भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड