गौरीगणपतीचे निमित्त पारंपरिक आरस व सांस्कृतिक दर्शन

उरुळी कांचन

बाप्पा गणेशाच्या आगमनानंतर गौरी गणपतीचेही घराघरांत मोठ्या थाटामाटात स्वागत होते. यांना गौरी, गौराई, लक्ष्मी आणि महालक्ष्मी अशा नावांनी ओळखतात. या पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमात आता आधुनिकता सुद्धा आली आहे.परंतु आपली ग्रामीण संस्कृती आजच्या पिढीला माहीत होण्यासाठी हा देखावा सादर केला आहे.

१)छप्पराचे घर- त्या घरासमोरील अंगणात बसून चाललेली नित्य कामे
उदा- धान्य पाकडणे- म्हणजे एक सुपात धान्य घेऊन ते पाकडत असताना त्यातील निष्फळ गोष्टी बाहेर घालवून शुद्ध चांगल्या गोष्टी आतमध्ये घ्यायच्या ही शिकवण एक गौरी देत आहे. तर
२) घराच्या अंगणात जमिनीवर लावलेल्या जात्यावर बायका पीठ दळायच्या.ते करत असताना शरीराचा व्यायाम व्ह्यायचा तसेच त्या सात्विक पिठाबरोबर मुखातून माहेरच्या आणि ससारच्या गुणांच्या ओव्या ऐकायला यायच्या हे दुसरी गौरी सांगत आहे.
अशाप्रकारे ग्रामीण संस्कृतीतील घरासमोरील सडा सारवण, रांगोळी, तुळस ,केरसुणी आणि ओव्या अशा मंगल प्रसंगाचे दर्शन घडविण्याचा सौ.अर्चना अष्टुळ आणि कु.श्रुती अष्टुळ यांनी प्रयत्न केला आहे.

Previous articleमांडवगण फराटा येथे तेरा ठिकाणी घरफोडी करणारे अट्टल चोराना पुन्हा दरोड्याच्या तयारीत असतानाच केडगाव पोलीसांनी केले जेरबंद : यवत पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी!
Next articleनारायणगाव येथे रक्तदान शिबिरात २२१ जणांनी केले रक्तदान