नारायणगाव येथे रक्तदान शिबिरात २२१ जणांनी केले रक्तदान

नारायणगाव : (किरण वाजगे)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री गणेशोत्सव व विक्रांत क्रीडा मंडळ, वाजगे आळी यांच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे नारायणगाव येथे नुकतेच आयोजन करण्यात आले.याप्रसंगी २२१ रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले.

शिबिर प्रसंगी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, सरपंच योगेश पाटे, डॉ. संदीप डोळे, विक्रांत पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाजगे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सुरज वाजगे, नारायणगाव विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, रोटरी क्लब नारायणगाव चे अध्यक्ष डॉ हनुमंत भोसले, जितेंद्र गुंजाळ, अभय वाव्हळ, जयेश कोकणे, गणेश वाजगे, तसेच माजी सैनिक यावेळी उपस्थित होते.

रक्तदान शिबिराच्या निमित्ताने माजी सैनिकांचा यावेळी मंडळाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संतोष वाजगे, निलेश गोरडे, अध्यक्ष मुकेश वाजगे, जितेंद्र वाजगे, श्रीकांत पाटील, हर्षल वाजगे, तेजस वाजगे, विघ्नहर वाजगे, निलेश रसाळ, भूषण शिवले, करण परदेशी, अनिकेत वाजगे तसेच मंडळाचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleगौरीगणपतीचे निमित्त पारंपरिक आरस व सांस्कृतिक दर्शन
Next articleउमाजी राजांचा इतिहास सर्वसामांन्य पर्यत गेला पाहिजे- संपतराव गारगोटे