डॉ.मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी स्तुत्य उपक्रम संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांचे प्रतिपादन

उरुळी कांचन

डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याने यांचा आदर्श घ्यावा.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मोर्चे निघाले. या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर आरक्षणासोबत मराठा समाजाच्या तरुणांनी उद्योग-व्यवसायात उतरणे आवश्‍यक आहे. त्यांचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण झाले पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. सध्याच्या उपलब्ध सरकारी नोकऱ्या पाहता हे करणे आवश्‍यक आहे. मराठा समाजाच्या तरुणांचे आर्थिक सक्षमीकरण सर्वात महत्त्वाचे असल्याचे मत संभाजी ब्रिगेड अध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी व्यक्त केले.

डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र ज्ञानोबा कांचन यांच्या अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने इयत्ता १० वी व १२ वीच्या परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ गरीब व गरजु विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, ‘अवघा मुलुख आपुला’ या विषयावर व्याख्यान संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांचे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना अध्यक्ष पांडुरंग राऊत होते.

याप्रसंगी पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी, ऊर्जा उद्योग समुह प्रमुख प्रकाश कुतवळ, देवस्थान ट्रस्ट कार्याध्यक्ष ज्ञानोबा कांचन, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा. के. डी. कांचन, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर , सरपंच राजेंद्र कांचन, ग्रा.प.सदस्य अमित कांचन, मिलिंद जगताप, माजी सरपंच एल. बी. कुंजीर, अस्मिता पतसंस्थेच्या चेअरमन प्रतिभा कांचन, संगिता टिळेकर, पतसंस्थेचे संचालक शरद वनारसे, सुभाष धुकटे, भाऊसाहेब कांचन, कांतीलाल चौधरी, संजय कांचन, खेमचंद पुरुसवाणी, चंद्रकांत लोणारी, माया शितोळे, सारिका काळभोर, बाळासाहेब कांचन, जनार्दन गोते, प्रकाश जगताप, मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण वाल्हेकर, तालुका रा. युवक कॉ. अध्यक्ष सागर कांचन, ऋषीकेश भोसले, ग्रा.प.सदस्य सुनिल तांबे, शांताराम चौधरी, सुभाष टिळेकर, विजय तुपे, बाळकृष्ण काकडे, राजेंद्र चौधरी, साईनाथ वाळके, सुरेश वाळेकर, संस्थेचे सर्व शाखाधिकारी, कर्मचारी, ठेविदार, सल्लागार, सभासद उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन छाया काळे यांनी केले. आभार शरद वनारसे यांनी मांडले.

Previous articleकु.रणजित शितोळे यांनी कोव्हेंट्री युनिव्हर्सिटी, लंडन, यूनाइटेड किंगडम मधुन ऑटोमोटिव्ह अँड ट्रान्सपोर्ट डिझाइन डिग्री मिळवली
Next articleपुर्व हवेलीत चंदन चोरांचा सुळसुळाट ; मांजरी खुर्द-कोलवडी हद्दीत चंदनाच्या झाडांवर पडली चोरट्यांची ‘कु-हाड