नारायणगाव येथे हिपॅटायटिस ‘बी’ चे मोफत लसीकरण

नारायणगाव : किरण वांजगे

रोटरी क्लब नारायणगाव व भोसले हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव येथील डॉ. भोसले हॉस्पिटलमध्ये जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त हिपॅटायटिस ‘बी’चे मोफत लसीकरण करण्यात आले. सुमारे ३५० जणांना या शिबिरात लसीकरण करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष डॉ. हनुमंत भोसले यांनी दिली. या शिबिराचा लाभ परिसरातील वाड्या वस्तीवरील ग्रामस्थांनी घेतला.

या शिबिरासाठी रोटरी क्लबचे हेमंत महाजन, सचिन घोडेकर, तेजस वाजगे ,योगेश भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.

हे शिबीर यशस्वी होण्यासाठी डॉ. हनुमंत भोसले, डॉ.रामदास उदमले, डॉ. सविता भोसले, डॉ शुभम भोसले, डॉ. सोनल कुटे, सिस्टर वैशाली गवंडी, स्वाती सोनवणे, पुजा पाबळे, मोनल आल्हाट, शिवानी आल्हाट, संजय कांबळे यांचे सहकार्य लाभले.

हिपाटायटिस ‘बी’ लिव्हरला प्रभावित करतो.
हा व्हायरस एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीमध्ये एकतर संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो.

हिपाटायटिस बी’ची लस ही जरूरी असणाऱ्या सगळ्या व्यक्तींना योग्य सल्ल्यानुसार दिल्यास हा आजार पूर्णपणे टाळता येतो.
– डॉ. हनुमंत भोसले,
अध्यक्ष रोटरी क्लब नारायणगाव.

Previous articleडॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. ३० रोजी शालेय साहित्य वाटप तसेच प्रविण गायकवाड यांचे व्याख्यान
Next articleविद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन