डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. ३० रोजी शालेय साहित्य वाटप तसेच प्रविण गायकवाड यांचे व्याख्यान

उरुळी कांचन

डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र ज्ञानोबा कांचन यांच्या अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने इयत्ता १० वी व १२ वीच्या परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ गरीब व गरजु विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप तसेच संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांचे अवघा मुलुख आपला या विषयावर व्याख्यान होणार. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना अध्यक्ष पांडुरंग राऊत उपस्थित राहणार आहे. अशी माहती पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी यांनी दिली.

याप्रसंगी ऊर्जा उद्योग समुह प्रमुख प्रकाश कुतवळ, देवस्थान ट्रस्ट कार्याध्यक्ष ज्ञानोबा कांचन, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा. के.डी.कांचन, जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर ,सरपंच राजेंद्र कांचन, पतसंस्थेचे संचालक शरद वनारसे, सुभाष धुकटे, भाऊसाहेब कांचन, कांतीलाल चौधरी, संजय कांचन, खेमचंद पुरुसवाणी, चंद्रकांत लोणारी, माया शितोळे, सारिका काळभोर, बाळासाहेब कांचन, जनार्दन गोते, प्रकाश जगताप, मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण वाल्हेकर, संस्थेचे सर्व शाखाधिकारी, कर्मचारी, ठेविदार, सल्लागार, सभासद उपस्थित राहणार आहेत.

शालेय साहित्य वाटप जिल्हा परिषद शाळा
उरुळी कांचन गाव- पांढरस्थळ, दत्तवाडी, टिळेकर वस्ती, खामगाव टेक, कोलवडी-उंद्रे वस्ती, डाळींब, कौलेवाडी, गव्हाणेवाडी. २२ आंगणवाडी शाळा उरुळी कांचन व परिसर वॉटर बग खाऊ वाटप. महावीर निवासी मूकबधिर विद्यालय उरुळी कांचन / वह्या व खाऊ वाटप..वृक्षारोपण डाळींब बन.. इत्यादी स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे पतसंस्थेचे संचालक भाऊसाहेब कांचन यांनी सांगितले.

Previous articleजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावे -आयुष प्रसाद
Next articleनारायणगाव येथे हिपॅटायटिस ‘बी’ चे मोफत लसीकरण