निधन वार्ता – वारूळवाडी येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब वारुळे यांचे निधन: संजय व नितीन वारुळे यांना पितृशोक

नारायणगाव – वारूळवाडी येथील प्रगतिशील शेतकरी, द्राक्ष बागायतदार तसेच उद्योजक बाळासाहेब ज्ञानेश्वर वारुळे (वय ७९ वर्ष) यांचे आज मंगळवार (दि.१० ) मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, जावई, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

नारायणगाव येथील हॉटेल निलायमचे संचालक संजय वारुळे व नितीन वारुळे यांचे ते वडील होत. त्यांचा अंत्यविधी बुधवार दिनांक ११ रोजी सकाळी ९ वाजता वारूळवाडी (ता. जुन्नर) येथील मीना नदीतीरावर होणार आहे. आवाज जनतेचा न्यूज नेटवर्क च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Previous articleयोग्य नियोजन करून सुरुवात केल्यास वेळेत करियर होते-यशवंत शितोळे
Next articleशिरोली बुद्रुक येथे तब्बल २४ वर्षानंतर उस्फूर्तपणे भरला स्नेह मेळावा