योग्य नियोजन करून सुरुवात केल्यास वेळेत करियर होते-यशवंत शितोळे

दिनेश पवार, दौंड

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना योग्य नियोजन करून सुरुवात केल्यास वेळेत करियर घडते व आपण यशस्वी होतो असे मत दौंड महाविद्यालयात आयोजित करियर कट्टा या कार्यक्रमात महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा.यशवंत शितोळे बोलत होते, शासनाच्या वतीने विद्यार्थी योग्य वेळी यशस्वी व्हावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात करियर कट्टा हा उपक्रम राबविण्यात येत आहे,यामध्ये आय.पी.एस.आपल्या दारी व उद्योजक आपल्या दारी हे उपक्रम राबविले जात आहेत, दररोज यशस्वी मान्यवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी वर्षभर सुरू असल्याचे व सर्व विद्यार्थ्यांना यातून योग्य मार्गदर्शन मिळत असल्याचे यावेळी यशवंत शितोळे यांनी सांगितले.

यावेळी संस्था प्रतिनिधी जयंत ढेकणे,प्रभारी प्राचार्य डॉ.पांडुरंग बिडकर, विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख प्रा.सुनील वाघ,प्रा.दिनेश पवार,करियर कट्टा संयोजक प्रा.भारतीबाई पवार,प्रा.सीमा डोके व सर्व प्राध्यापक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.सुनील वाघ यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.भारतबाई पवार यांनी केले.

Previous articleनाशिकमध्ये आखिल भारतीय विद्युत मजदूर संघाचे १७ वे त्रिवर्षीक अधिवेश होणार
Next articleनिधन वार्ता – वारूळवाडी येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब वारुळे यांचे निधन: संजय व नितीन वारुळे यांना पितृशोक