नारायणगाव ग्रामपंचायत येथे कोरोना योद्ध्यांच्या हस्ते ध्वजारोहन

नारायणगाव : (किरण वाजगे)-

नारायणगाव ग्रामपंचायत कार्यालयावरील ध्वजारोहन कार्यक्रम नारायणगावातील कोरोना योद्ध्यांच्या हस्ते आज करण्यात आले.

नारायणगाव व परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना रुग्णवाहिका चालक संजय भोर, विनायक जाधव, ओंकार जंगम यांनी कोरोना काळात कोरोना संशयीत व्यक्तींचे पीपीई किट घालून आपल्या जीवाची पर्वा न करता अंत्यसंस्कार केले, आजारी पेशंट कोणतीही पर्वा न करता दवाखान्यापर्यंत पोहचविण्याचे कार्य देखील केले. तसेच आशावर्कर,आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे कामही उल्लेखनीय आहे.

या कार्याचे कौतुक करत लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे व ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या वतीने कोरोना योद्धा रुग्णवाहिका चालक संजय भोर, विनायक जाधव, ओंकार जंगम, व ग्रामपंचायत कर्मचारी माऊली माने यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहन करण्यात आले. यानिमित्त गावात शासकीय कार्यालयांना विद्युत रोषणाई, मेन बाजारपेठेत तिरंगी फुग्यांची सजावट करण्यात आली.

यानिमित्तानं लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, उपसरपंच सारिका डेरे, मंडलाधिकारी डी. बी. काळे, तलाठी नामदेव सोनवणे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, संतोष दांगट, गणेश पाटे, राजेश बाप्ते, ज्योती दिवटे, रुपाली जाधव, भागेश्वर डेरे, योगेश गांंधी, नंदू अडसरे, ईश्वर पाटे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleपोलिस प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी ‘स्मार्ट पोलीसींग’ उपक्रम उपयुक्त – उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleदौंड मध्ये 105 रुग्णांपैकी 6 रुग्ण कोरोना पॉजिटिव्ह