दौंड मध्ये 105 रुग्णांपैकी 6 रुग्ण कोरोना पॉजिटिव्ह

Ad 1

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

दौंड शहरातील राज्यराखीव पोलीस बल गट-क्रमांक 5(SRPF-5) येथील 6 जणांचे रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय दौंड चे वैद्यकीय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली,उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 13/8/2020 रोजी एकूण 105 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यांचे रिपोर्ट दिनांक-15/8/2020 रोजी प्राप्त झाले, त्या पैकी 6 व्यक्ती पॉजीटिव्ह आले आहेत,हे सर्व SRPF 5 गटातील रुग्णाचा समावेश आहे,मात्र दौंड शहरात एकही रुग्ण सापडला नाही. त्यामुळे परिसरात दिलासादायक वातावरण आहे, SRPF 5 गटातील सर्व रुग्ण 30 ते 54 वयोगटातील आहेत.
दौंड परिसरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात येत आहे तरीही नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे, नागरिकांनी अजूनही नियमितपणे नियम पाळणे,अत्यावश्यक गरजा सोडल्या तर विनाकारण बाहेर पडणे,गर्दी करणे,समारंभ ला नियमापेक्षा जास्त गर्दी होऊ न देणे,ही खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.