तमाशा कलावंतांना राज्य शासनाने बिनव्याजी कर्जासह अनुदान द्यावे –   तमाशा फडमालक मंगला बनसोडे यांची थेट शरद पवार यांच्याकडे मागणी

नारायणगाव ( किरण वाजगे ) – कोरोना महामारीने राज्यातील तमाशा लोक कलावंत  आर्थिक अडचणीत आला असल्याने कलावंतांना राज्य शासनाने अनुदान देऊन तमाशा फड मालकांना बिन व्याजी कर्ज देण्याची मागणी ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेच्या वतीने जेष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केलीआहे .

   गेली पाच महिन्यापासून कोरोनाच्या महामारीमुळे तमाशा क्षेत्र अडचणीत आले आहे . यात्रा जत्रा यांच्यावर अवलंबून असणारा यंदाच्या वर्षीचा हंगाम पूर्ण वाया गेला असल्याने तमाशा कलाकार, कामगार ,तमाशा मालक हे आर्थिक अडचणीत आले आहेत.  तमाशा वरच प्रपंच सुरू असल्याने तमाशा क्षेत्रातील कामगार व कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे राज्य शासनाने तमाशा क्षेत्रात सर्व कलावंतांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अनुदान द्यावे अशी मागणी सर्व तमाशा क्षेत्रातील कामगार व कलावंतांच्या वतीने ज्येष्ठ तमाशा कलावंत बनसोडे यांनी केले आहे . सन २०१८ ते २०१९ महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळ व अवकाळी पाऊस , २०१९ ते २०२० या सालात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना व्हायरस या रोगामुळे राज्यातील लोकनाटय तमाशा मंडळांना आर्थिक दृष्टया झळ सोसावी लागत आहे. राज्यामध्ये सात महिने तंबुचे फडांचे कार्यक्रम राज्यभर सुरु असतात .

विजयादशमी ते बौद्ध पौर्णिमा या कालावधीत चालणारे तमशा फड व गुढी पाडवा ते बौद्ध पौर्णिमापर्यंत चालणारे यात्रा (गावची) साजरी करणारे हे फड दिड महिना कालावधीत काम करतात. सध्या कोराना व्हायरसच्या परिस्थितीमध्ये तमाशा फड मालकांनी या . लोकडाऊनच्या काळात प्रत्येक तमाशा फड मालकांनी परिस्थिीतीनुसार संबंधित कालाकारांना मदत केली असून ती अन्नधान्य, औषधे, संसार उपयोगी साहित्यांची मदत झाली. परंतु आताच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सर्व फड मालकाना सतत तीन वर्ष  लोकनाटय तमाशा मंडळाचे प्रत्येकी ८० ते ८५ लाख रूपये सात महिने तमाशाचे नुकसान झालेले आहे व चैत्र गुढी पाडव्यापासून चालणाऱ्या तमाशाचे नुकसान २० ते २५ लाख रूपये झालेले असल्याने  राज्य शासनाने सर्व  तमाशा फड मालकांना अनुदान किंवा पॅकेज द्यावे व फड मालकास बिनव्याजी कर्ज द्यावे हि मागणी शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे . राज्यातील तमाशा कलावंताच्या कुटूंबातील संख्या सरासरी ५ ते ६ सदस्य धरल्यास १ लाख ६४ हजार ६३५ एवढी होत आहे.त्यामुळे सरकारने सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून वित्त व नियोजन मंत्री,सांस्कृतिक मंत्री यांच्या सोबत  आर्थिक  मदत व धोरण ठरविणेसाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात यावे.अशी मागणी अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेच्या वतीने अविष्कार मुळे ,संभाजी जाधव व मोहित नारायणगावकर यांनी केली आहे .

Previous articleपाळलेले नियम व ठेवलेला संयम यामुळे दौंडची कोरोना परिस्थिती सुधारत आहे-पोलीस निरीक्षक सुनील महाडिक
Next articleभिगवण शिक्षण प्रसारक मंडळाकडून कोविड केअर सेंटरसाठी बेडची मदत