पाळलेले नियम व ठेवलेला संयम यामुळे दौंडची कोरोना परिस्थिती सुधारत आहे-पोलीस निरीक्षक सुनील महाडिक

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

दौंड शहरामध्ये व व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे .ही दौंड करांसाठी अतिशय सुखद व समाधानकारक बाब आहे, एकंदर पाहणी वरून हा काही योगायोग नाही दौंड करांनी पाळलेले नियम, ठेवलेला संयम, प्रशासनाने दिवस-रात्र केलेली मेहनत त्याचे हे फलित आहे.असे मत दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी व्यक्त केले आहे.
दौंड शहरातील व ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांनी कित्येक महिन्यांचा लॉक डाऊन पाळला .आजही अंशतः लॉक डाउन दौंडचे व्यापारी पळत आहेत. सायंकाळी पाच नंतर सकाळी आठ वाजेपर्यंत दौंड शहरांमध्ये जर फेरफटका मारला तर शुकशुकाट आहे.

आम्ही पोलीस नाकाबंदी ला असताना जवळजवळ 95 टक्के लोक हे मास्क लावलेले असतात .पाच टक्के हा अपवाद पकडा .प्रत्येक दुकानांमध्ये सॅनिटायजरची बाटली ठेवलेली आहे दुचाकी वाहनावरून जरी लोकांची डबलसीट मोमेंट असली तरी चारचाकी वाहनांमध्ये 3 पेक्षा जास्त लोक दिसत नाहीत ही समाधानाची बाब आहे.

दौंड पोलीस ठाण्यात तर्फे आत्तापर्यंत लॉक डाउन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 800 केसेस करण्यात आलेले आहेत. सर्व सामाजीक सण-उत्सव यामध्ये गर्दी करण्याचे लोकांनी टाळलेले आहे. तरीपण बरेच ठिकाणी आता टोळक्याने गप्पा मारत बसण्याची प्रवृत्ती परत एकदा बळावत आहे. त्यामुळे माझी सर्वांना नम्र विनंती आहे विनाकारण एकत्र बसू नका. एकत्र फिरू नका. बिना मास्क एकमेकांशी बोलू नका. मयत लग्न समारंभ वाढदिवस या कार्यक्रमात शक्यतो घरगुती स्वरूप असावे. वीस पेक्षा जास्त गर्दी करू नका. आयुर्वेदिक काढे व गरम पाणी सतत पीत रहा .आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचा वापर करा .शक्यतो हॉटेल व टपरी वरचे खाणे व चहा पिणे टाळा. एक वेळ दौंड शहराची भयानक होत चाललेली स्थिती आज कुठे सुधारणेकडे निघालेली आहे तरी आपण आणखी काही महिने नियमांचे पालन करा आणि एक आदर्श सर्वांसमोर घालून देऊया स्वतःही नियमांचे पालन करूया व दुसऱ्यांनाही नियमांचे पालन करायला लावूया दौंड पोलिसांतर्फे याहीपुढे नियमांचे पालन करण्यासाठी कारवाईमध्ये सातत्य राहणार आहे
आपले दौंड निश्चित कोरोना पासून दूर राहील यात शंका नाही,असा विश्वास पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी व्यक्त केला आहे.

Previous articleदौंड तालुका माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा संपन्न
Next article तमाशा कलावंतांना राज्य शासनाने बिनव्याजी कर्जासह अनुदान द्यावे –   तमाशा फडमालक मंगला बनसोडे यांची थेट शरद पवार यांच्याकडे मागणी