भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाकडून कोविड केअर सेंटरसाठी बेडची मदत

Ad 1

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने भिगवण येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरसाठी 30 बेडची मदत करण्यात आली आहे,संस्थेचे अध्यक्ष -अजित क्षीरसागर व ग्रामपंचायत सदस्य प्रा.तुषार क्षीरसागर व संस्थेचे पदाधिकारी यांच्यावतीने ही मदत करण्यात आली आहे.

भिगवण परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, यामुळे येथील नागरिकांना भिगवण मध्येच कोविड सेंटर उपलब्ध व्हावे अशी मागणी नागरिकांमधून होत होती, यासाठी काही दिवसांपूर्वी तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी कोविड केअर सेंटर उभारणीसाठी बैठक घेतली होती यावेळी त्यांनी मदतीसाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन केले होते,याला प्रतिसाद देत ग्रामपंचायत सदस्य प्रा. तुषार क्षीरसागर यांनी 30 बेड देण्याचे जाहीर केले होते,सामाजिक बांधिलकी जपत भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने 30 बेड ची उपलब्धता करून देण्यात आली आहे.

भिगवण शिक्षण प्रसारक मंडळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास घडावा व त्यातून सामाजिक बांधिलकी चे गुण रुजावे यासाठी शिक्षणाची उज्वल परंपरा टिकवून आहे,आणि यातच आशा कोरोना सारख्या प्रादुर्भावात 30 बेड देवून सामाजिक बांधिलकी जोपासल्यामुळे परिसरतुन संस्थेचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले जात आहे.