‘राष्ट्रीय कन्या दिना’चे औचित्य साधून संतुलन संस्थेच्यावतीने मुलींच्या भविष्यनिर्वाहासाठी ‘सुकन्या समृद्धी’ योजनेच्या पासबुकचे वाटप

गणेश सातव,वाघोली

राष्ट्रीय कन्या दिनाचे औचित्य साधून दगडखाण क्षेत्रातील कामगार बांधवांच्या मुलींसाठी संतुलन संस्थेमार्फत सुकन्या समृध्दी योजनेची पासबुक वाटप करण्यात आले.

दगडखाणीतील कामगार बांधवांच्या मुलींच्या भविष्यकालीन आयुष्यासाठी आर्थिक तरतूद असावी या सामाजिक हेतूने संतुलन संस्थेच्या पुढाकाराने सुकन्या समृध्दी योजनेची शंभरहून अधिक बचत खाती खोलण्यात आली.या खाते पुस्तकांचे वितरण राष्ट्रीय  सुकन्या दिनाचे औचित्य साधत वडगाव शेरी मतदार संघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे व पोस्ट विभागाचे जनसंपर्क अधिकारी गणेश खेडकर यांच्या हस्ते खराडी, (तुळजाभवानी नगर ) येथील संतुलन भवन येथे करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अँड. बी.एम.रेगे,संचालिका पल्लवी रेगे, नगरसेवक भैयासाहेब जाधव, महाराष्ट्र खादी ग्राम उद्योग विभागाच्या संचालिका छाया बापट, वैभव पंचमुख,सागर बारदेस्कर,जॉन फर्नांडीस,अविनाश साळवे आदींसह मुली आणि मुलींचे पालक उपस्थित होते.

Previous articleश्री कुलस्वामी को-ओपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा व्यवहार पारदर्शक – माजी अध्यक्ष शरद सोनवणे
Next articleअभाविप’ने काढली जुन्नरमध्ये भव्य तिरंगा पदयात्रा