राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टद्वारे राज्यातील तमाशा कलावंतांसाठी एक कोटी रुपये आर्थिक मदत

नारायणगाव ,किरण वाजगे

राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टद्वारे राज्यातील तमाशा कलावंतांसाठी एक कोटी रुपये आर्थिक मदत आज मुंबई येथे जाहीर करण्यात आली. अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पारंपरिक लोककला तथा लोकनाट्य तमाशा वर बंदीचे सावट पसरले होते. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व तमाशा फडमालकांनी लवकरात लवकर तमाशा सुरू करण्यास परवानगी न दिल्यास मंत्रालयासमोर व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा नुकत्याच झालेल्या नारायणगाव येथील पत्रकार परिषदेत तमाशा फड मालकांनी दिला होता. या अनुषंगाने जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी तमाशा फड मालकांना तमाशा सुरू करण्याबाबत आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते.

त्यानुसार आज मुंबई येथे आमदार अतुल बेनके यांनी पुढाकार घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची व लोकनाट्य तमाशा फड मालकांची भेट घडवून आणली व तमाशा सुरू करण्याबाबतची बैठक यशस्वी झाली व यावेळी तमासगीरांचे संभाव्य आत्मदहन आंदोलन मागे घेत येत्या एक तारखेपासून तमाशा लोककला सर्वत्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे स्वतः आमदार अतुल बेनके व तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी सांगितले.

दरम्यान राज्यातील सर्व तमाशा कलावंतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे एक कोटी रुपये आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचेही आमदार बेनके यांनी सांगितले.
या प्रसंगी तमाशा फड मालक मुसाभाई इनामदार, मोहित नारायणगावकर, पप्पू मुळे मांजरवाडीकर, शफीभाई शेख तानाजी मुसळे उपस्थित होते.

Previous articleखामगावात लग्न समारंभातील कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या “पवार अॕग्रो रिसॉर्ट” वर कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांची मागणी
Next articleग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा लेखकांशी थेट संवाद