टीडीएफ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पुणे जिल्हा प्रतिनिधीपदी राजेंद्र बोधे यांची निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

हवेली तालुका माध्यमिक शिक्षक व लोकशाही आघाडी यांची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यामध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून अशोक नाळे यांची व राजेंद्र बोधे यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. शिक्षक लोकशाही आघाडी ( टी. डी . एफ.) किसन कोकाटे यांची जिल्हा प्रतिनिधी तर दत्तात्रेय कोलते यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली. इरफान पठाण हवेली तालुका टी डी एफ मध्ये खजिनदारपदी निवड झाली.

पदाधिकाऱ्यांचे राज्य टी डी एफ चे कार्याध्यक्ष जी के थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच तनुजा सूर्यवंशी यांची हवेली तालुका माध्यमिक शिक्षक महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पंडित ज्योती यांची जिल्हा महिला प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. तसेच कार्यक्रमाचे आयोजन पण नियोजन चिंतामणी विद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर खरात यांनी आभाराचे गोड काम केले. कामाचे संपूर्ण सहकार्य नियोजन नेवाळे सर यांनी केले.

Previous articleतुळापुर मध्ये शंभुराज्याच्या पवित्र भुमीमध्ये जिजामाता जयंती वृक्षारोपणने साजरी : महिलांचा अनोखा स्तुत्य उपक्रम
Next articleखतांच्या वाढलेल्या किमती पूर्ववत करा – कृषीमंत्री दादाजी भुसे यांची मागणी