बांधावरचे‌ लाकूड नेल्याने लाथाबुक्यांनी मारहाण

मंचर- शेताच्या बांधावरील लाकूड का नेले या कारणावरून शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना साकोरे ( ता.आंबेगाव ) गावच्या हद्दीत लोंढेमळा येथे ( दि.८ )रोजी घडली आहे.

किरण सिताराम लोहोटे (रा. साकोरे लोंढेमळा ) यानी फिर्याद दाखल केली असून योगेश वसंत मोढवे, अमित वसंत मोढवे,वसंत मारुती मोढवे (रा.साकोरे ता. आंबेगाव जि. पुणे) यांच्या विरुद्ध मंचर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , फिर्यादी किरण लोहोटे हे ( दि. ८) रोजी ५ .३० वाजता साकोरे येथे लोंढे मळ्यात घराच्या मागे बांधावरील पडलेलं लाकूड का नेले म्हणून फिर्यादीच्या मामांना शिविगाळ करत होते. त्याच वेळी फिर्यादी तेथे गेले आणि म्हणाले कि मामांना शिवीगाळ का करताय असे विचारले असतानाच आरोपी योगेश मोंढवे म्हणाला कि तुझा काय संबंध असे म्हणत फिर्यादी यांच्या अंगावर धावून येत हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच तेथेच बाजूला पडलेल्या लाकडाने डोक्यात जोरजोरात मारून दुखापत करून आमच्या नादी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही अस बोलून तिथून निघून गेले. या बाबत लोहोटे यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पो. नि. होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. साबळे हे करत आहे.

Previous articleभाजपाच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अँड.मुलाणी यांचा राजीनामा
Next articleरायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा